Download App

China News : चीनची खोडी! अरुणाचल प्रदेशातील 30 ठिकाणांचे केले नामकरण

  • Written By: Last Updated:

China On Arunachal Pradesh : लोकसभा निवडणुकीच्या काळात चीनने (China) एक मोठा निर्णय घेतल्याने मोदी सरकारच्या (Modi government) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

चीनने पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशवर (Arunachal Pradesh) आपला हक्क दाखवत 30 नवीन नावांची यादी जारी केली आहे. मात्र अद्याप या नावांचा अधिक तपशील उपलब्ध झालेला नाही परंतु ही नावे चिनी अक्षरात लिहिली आहेत.

ही नावे पर्वत, नद्या आणि काही ठिकाणांना देण्यात आली आहेत. यामुळे आता मोदी सरकारवर या प्रकरणात विरोधकांनी टीकेला सुरुवात केली आहे.

अरुणाचल प्रदेशला काही दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी  लष्कराच्या बोगद्याचे उद्घाटन केले होते मात्र तेव्हापासून चीन हतबल झाला होता आणि सातत्याने अरुणाचल प्रदेशबाबत वक्तव्य करत होता.

भाजपाचा माइंडगेम! रत्नागिरी घ्या पण, ठाणे किंवा कल्याण द्या; भाजपाच्या अटीने शिंदेंची कोंडी

तर आत चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने  ‘जंगनान’ मधील प्रमाणित भौगोलिक नावांची चौथी यादी जाहीर केल्याची माहिती रविवारी चीनचे मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ (Global Times) ने दिली. चीन अरुणाचल प्रदेशला ‘जंगनान’ म्हणतो.

जंगनानसाठी चीनकडून 30 नावे मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर पोस्ट करण्यात आली आहेत.

काँग्रेसला दिलासा! ‘त्या’ प्रकरणात होणार नाही कारवाई, प्राप्तिकर विभागाकडून मोठा निर्णय

तर दुसरीकडे आतापर्यंत या प्रकरणात फारशी माहिती समोर आली नसली तरी ही नावे 11 निवासी क्षेत्रे, 12 पर्वत, चार नद्या, एक तलाव, एक खिंड आणि अरुणाचल प्रदेशातील एक रिकामी जमीनला देण्यात आली असल्याची माहिती काही मीडिया रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.

भुजबळांचा पाय खोलात! महाराष्ट्र सदन घोटाळा पाठ सोडेना; न्यायालयाने नोटीसच धाडली

follow us

वेब स्टोरीज