Loksabha Election 2024 : काँग्रेसला दिलासा! ‘त्या’ प्रकरणात होणार नाही कारवाई, प्राप्तिकर विभागाकडून मोठा निर्णय

Loksabha Election 2024 : काँग्रेसला दिलासा! ‘त्या’ प्रकरणात होणार नाही कारवाई, प्राप्तिकर विभागाकडून मोठा निर्णय

Loksabha Election 2024 : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक घोषणा देखील करताना दिसत आहे.

यातच आता देशाचा सर्वात जुना राजकीय पक्ष काँग्रेसला (Congress) आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) मोठा दिलासा मिळाला आहे. साडेतीन हजार कोटी रुपयांच्या प्राप्तिकर थकबाकी प्रकरणी लोकसभा निवडणूक होईपर्यंत काँग्रेस पक्षावर कोणतीही कारवाई होणार नसल्याची माहिती प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) सर्वोच्च न्यायालयामध्ये(Supreme Court) दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयामध्ये प्राप्तिकर विभागाकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता (Solicitor General Tushar Mehta) यांनी युक्तिवाद करत याबाबात माहिती दिली आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात माहिती दिली कि, सध्या देशात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे यामुळे आम्ही या प्रकरणात काँग्रेस पक्षावर कोणतीही दंडात्मक कारवाई करणार नाही.

आम्हाला निवडणुकीच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षासमोर कोणतीही अडचण निर्माण करायची नाही अशी माहिती सॉलिसिटर जनरल  तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली. ही सुनावणी न्या. बी.व्ही. नागरत्ना आणि न्या. ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्यापीठासमोर पार पडली.

2018 मध्ये काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करून 2016 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने एका दिवाणी खटल्याच्या सुनावणीदरम्यान दिलेल्या आदेशांना आव्हान दिले होते. या याचिकेमध्ये काँग्रेसने प्राप्तिकर विभागाकडून आलेल्या नोटिशीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी केली होती.

नवीन व्हेरियंटमध्ये Kia Seltos लॉन्च! फीचर्स आहे खूपच भारी, किंमत फक्त …

न्या. बी.व्ही. नागरत्ना आणि न्या. ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्यापीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान प्राप्तिकर विभागाकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद करत काँग्रेस पक्षावर कोणतीही कठोर कारवाई होणार नसल्याचे सांगितले. याच बरोबर त्यांनी या प्रकरणात पुढील सुनावणीची तारीख जुलैमध्ये द्यावी अशी मागणी देखील केली.

लोकसभेसाठी लंकेंची जनसंवाद यात्रा! जयंत पाटलांसह राऊतांच्या उपस्थितीत शुभारंभ

प्रकरण काय

प्राप्तिकर विभागाने गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला हिशेब वेळेत न देणे तसेच इतर अनियमिततेच्या कारणावरून अनेक नोटिसा बजवाले आहे. तर प्राप्तिकर विभागाकडून काँग्रेसचे दिल्लीमध्ये असणाऱ्या चार बँकांमधील तब्बल 215 कोटी रुपये काढून घेतल्याचा आरोप कॉग्रेसकडून करण्यात येत आहे.

महाविकास आघाडीत फिलगुड! महायुतीला मात्र बंडखोरीचे धक्के, ‘या’ मतदारसंघात डोकेदुखी

या प्रकरणात आता पुढील सुनावणी 24 जुलैला होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालयात अभिषेक मनु सिंघवी व खासदार विवेक तनखा यांनी बाजू मांडली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube