नवीन व्हेरियंटमध्ये Kia Seltos लॉन्च! फीचर्स आहे खूपच भारी, किंमत फक्त …

नवीन व्हेरियंटमध्ये Kia Seltos लॉन्च! फीचर्स आहे खूपच भारी, किंमत फक्त …

Kia Seltos : भारतीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून मिड साइज सेगमेंटमध्ये Kia ची लोकप्रिय मिड साइज कार Kia Seltos धुमाकूळ घालत आहे. या कारमध्ये ग्राहकांना उत्तम फीचर्ससह भन्नाट मायलेज आणि जबरदस्त स्पेस मिळत असल्याने या कारची मागणी बाजारात वाढत आहे.

यातच जर तुम्ही देखील ही मस्त कार खरेदी करण्याची तयारी करत असाल तर हे जाणून घ्या कि, कंपनीने Kia Seltos आणखी दोन नवीन व्हेरियंटमध्ये लाँन्च केली आहे.

या दोन्ही नवीन व्हेरियंटमध्ये ग्राहकांना जबरदस्त फीचर्ससह बरचं काही नवीन पाहायला मिळणार आहे. चला मग जाणून घेऊया या नवीन व्हेरियंटबद्दल सविस्तर माहिती.

Kia ने भारतीय बाजारात पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि आपली विक्री वाढवण्यासाठी Kia Seltos चे दोन नवीन व्हेरियंट HTK+ पेट्रोल IVT आणि HTK+ डिझेल 6AT लाँन्च केले आहे.

ग्राहकांना या दोन्ही नवीन व्हेरियंटमध्ये जबरदस्त फीचर्स कंपनीकडून ऑफर करण्यात आले आहे.

कंपनी या नवीन व्हेरियंटमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, ड्राइव्ह आणि ट्रॅक्शन कंट्रोल मोड्स, पॅडल शिफ्टर्स, एलईडी कनेक्टेड टेल लॅम्प्ससह अनेक फीचर्स ऑफर करत आहे.

याच बरोबर ग्राहकांना या नवीन व्हेरियंटमध्ये कंपनीकडून 16 इंच अलॉय व्हील, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, मल्टी फंक्शनल स्टीयरिंग व्हील, आठ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्मार्ट की, पुश बटन स्टार्ट/स्टॉप, रिअर डीफॉगर, एलईडी डीआरएल, इलेक्ट्रिकली फोल्डेबल मिरर सारखी जबरदस्त फीचर्स देण्यात आली आहे.

शक्तिशाली इंजिन

माहितीसाठी जाणून घ्या कि, ग्राहकांना कंपनी Kia Seltos मध्ये 1.5 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देते. यामुळे या कारमध्ये 114 bhp आणि 144 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो. तर दुसरीकडे या कारला 1.5 लीटर डिझेल इंजिनमधून 114 bhp आणि 250 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो.

खर्च होणार फक्त इतके पैसे

कंपनीने आपल्या नवीन HTK+ पेट्रोल IVT व्हेरियंटची एक्स शोरुम किंमत15.40 लाख रुपये ठेवली आहे तर HTK+ डिझेल 6AT या व्हेरियंटची एक्स शोरुम किंमत कंपनीने16.90 लाख रुपये निश्चित केली आहे.

नामदेव जाधव म्हणतात मला शिवाजी महाराजांचा दृष्टांत झालाय… बारामती लोकसभा लढणार

यामुळे जर तुम्ही मस्त मस्त फीचर्ससह नवीन कार खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी Kia Seltos चे हे दोन्ही नवीन व्हेरियंट सर्वात बेस्ट ठरू शकतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज