Lok Sabha Elections : अरुणाचलात काँग्रेसला धक्का! आमदारांच्या हाती भाजपाचा झेंडा

Lok Sabha Elections : अरुणाचलात काँग्रेसला धक्का! आमदारांच्या हाती भाजपाचा झेंडा

Lok Sabha Elections 2024 : गुजरातमधील काँग्रेसच्या एक आमदाराने राजीनामा (Lok Sabha Elections 2024) दिल्याची घटना ताजी असताना काँग्रेसला (Congress Party) आणखी एक धक्का बसला आहे. अरुणाचल प्रदेशातील दोन काँग्रेस आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. यांसह येथील एनपीपी पक्षाच्या दोन आमदारांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अरुणाचल प्रदेशातील पूर्व सियांग जिल्ह्यातील आमदार लोम्बो तायेंग यांच्यासह अपक्ष आमदार चकत अबो यांनीही भाजपात प्रवेश केला. काँग्रेसचे दोन आमदार निनॉन्ग एरिंग आणि वांगलिन लोवांगडोंग यांच्यासह दोन आमदारां भाजपात प्रवेश केला. या चारही आमदारांना राज्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक सिंघल आणि राज्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या उपस्थितीत पक्षाची सदस्यता देण्यात आली.

काँग्रेसला मोठा झटका! माजी विरोधीपक्ष नेत्याने पक्षाचा हात सोडला

लोम्बो तायेंग याआधीच्या काँग्रेस सरकारमध्ये मंत्री होते. मात्र त्यांनी अशा वेळी पक्षाला धक्का दिला आहे ज्यावेळ राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. आता काँग्रेसकडे फक्त एकच आमदार शिल्लक राहिला आहे. 2019 मध्ये काँग्रेसने 4 जागा जिंकल्या होत्या. तेव्हापासून आतापर्यंत 3 जागांचे नुकसान झाले आहे. या पक्षांतरानंतर आता भाजपाचे 57 आमदार झाले आहेत. दोन अपक्ष आणि काँग्रेसचा फक्त एकच आमदार शिल्लक राहिला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात लोकसभा निवडणुका होतील त्याच दरम्यान राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.

गुजरातमध्येही काँग्रेसला धक्का 

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) काँग्रेस पक्षाला एकामागून एक धक्के बसत आहेत. आता गुजरातमधील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या अर्जुन मोढवाडिया (Arjun Modhwadia) यांनी गुजरात विधानसभेचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा गुजरात विधानसभेचे अध्यक्ष शंकरभाई चौधरी यांच्याकडे सुपूर्द केला.

अर्जुन मोढवाडिया यांनी पक्ष सोडणे हा गुजरात काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. अर्जुन मोढवाडिया हे ओबीसी समाजाचे आहेत. त्यांचा सौराष्ट्रातील किनारपट्टी भागात मोठा प्रभाव आहे. त्यांनी गुजरात विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदही भूषवले आहे आणि राज्यात काँग्रेस पक्षाचे नेतृत्वही केले आहे. कधीकाळी गुजरातमध्ये त्यांची गणना अहमद पटेल यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर केली जात होती. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना अर्जुन मोढवाडिया हे गुजरात काँग्रेस पक्षाचा चेहरा होते.

Nitin Gadkari : तीन दिवसांत माफी मागा नाही तर.. नितीन गडकरी काँग्रेस नेत्यांवर का चिडले?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज