भुजबळांचा पाय खोलात! महाराष्ट्र सदन घोटाळा पाठ सोडेना; न्यायालयाने नोटीसच धाडली
Maharashtra Sadan Scam another notice to Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळा काही केल्या छगन भुजबळ यांची पाठ (Chhagan Bhujbal) सोडण्यास तयार नाही. आताही या प्रकरणात भुजबळ कुटुंबीय पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी (Anjali Damania) उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर काल सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने छगन भुजबळ, पंकज आणि समीर यांना नोटीस बजावून चार आठवड्यांत उत्तर द्या, असे निर्देश दिले आहेत.
Maharashtra Politics : 2015 नंतर राष्ट्रवादीत निवडणुकाच नाहीत; तटकरेंच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट!
याआधी एसीबी न्यायालयाने सप्टेंबर 2011 मध्ये या प्रकरणातून सार्वजनिक विभागाचे तत्कालीन सचिव दीपक देशपांडे यांना वगळून छगन भुजबळ यांच्यासह मुलगा पंकज आणि पुतण्या समीर आणि अन्य काहीजणांना दोषमुक्त केले होते. मात्र, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी य निर्णयास आव्हान दिले होते. तसेच देशपांडे यांनीही आरोप निश्चितीस आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर अंतिम निर्णय होईपर्यंत आरोप निश्चितीतून दिलासा मिळावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. यानंतर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनीही भुजबळांना आरोपमुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात आव्हान दिले आहे.
9 सप्टेंबर 2021 रोजी एसीबीच्या विशेष न्यायालयाने भुजबळ कुटुंबियांची निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबर हातमिळवणी केली त्यामुळे भुजबळ ईडीच्या कचाट्यातून वाचले, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. आता नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी त्यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. आता याचवेळी त्यांना नोटीस बजावण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
छगन भुजबळांना थेट दिल्लीतून निरोप, नाशिक लोकसभेची तयारी सुरू करण्याचे दिले आदेश
दरम्यान, माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले होते, की नाशिकचा उमेदवार कोणताही ठरो. मग तो राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा असो की भाजपाचा जो उमेदवार दिला जाईल त्याच्या पाठीमागे ताकदीने उभे राहू. भुजबळ कुटुंबियांसाठी कोणत्याही मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केलेली नाही. भुजबळ कुटुंब कोणत्याही जागेसाठी आग्रही नाही. कुटुंबातील एकाही व्यक्तीसाठी मी उमेदवारीची मागणी केलेली नाही असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले होते.