Donald Trump Planning Remove Transgenders From Us Military : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यानंतर अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी होताच अमेरिकेतील LGBTQIA+ समुदायात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, नवीन अहवाल समुदायाला आणखी एक धक्का देऊ शकतो. ट्रम्प एका कार्यकारी आदेशाची योजना आखत आहेत. ते सर्व तृतीयपंथी (Transgender) लोकांना यूएस सैन्यातून काढून टाकू शकतात.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तृतीयपंथीयांना वैद्यकीय रजा दिली जाईल, ज्यानुसार त्यांना सैन्यासाठी अपात्र घोषित केलं जाईल. यापूर्वी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी असा आदेश लागू केला होता. त्यांनी तृतीयपंथी लोकांना सैन्यात भरती होण्यास बंदी घातली. तथापी, जे आधीपासून सैन्याचा भाग (Us Military) होते, त्यांना परवानगी देण्यात आली.
बंडखोरी टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून खरबरदारी, नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
द संडे टाइम्सच्या वृत्तानुसार, यावेळी सध्या सेवेत असलेल्या अशा तृतीयपंथीयांनाही काढून टाकले जाईल. पुढच्या वर्षी 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्याच दिवशी ट्रम्प हा आदेश देऊ शकतात. अंदाजे 15,000 ट्रान्सजेंडर लोक सध्या यूएस सैन्यात सक्रियपणे सेवा करत आहेत. या अहवालात म्हटलं आहे की, जेव्हा राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी ट्रम्प यांनी लष्करातील ट्रान्सजेंडर्सवर घातलेली बंदी उठवली, तेव्हा हजारो लष्करी कर्मचाऱ्यांनी त्यांची ट्रान्सजेंडर ओळख उघड केली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेण्यामागे काही कारणे देखील अधोरेखित केली आहेत. यामागे त्यांनी अमेरिकेत जागृती करून डाव्या विचारसरणीपासून मुक्तता करणे, अशी कारणे दिली आहेत. त्यांच्या पहिल्या कार्यकाळापासून, ट्रम्प म्हणाले की ते कोणत्याही शाळेतील मुलांसाठी तृतीयपंथी आणि इतर लैंगिक-संबंधित विषयांसारख्या “वेडेपणा” ला प्रोत्साहन देण्याविरूद्ध धोरणे लागू करतील. त्यांनी तृतीयपंथी खेळाडूंना मुलींच्या खेळापासून दूर ठेवण्याचा सल्लाही दिला आहे.
नगर जिल्ह्यातून ‘या’ आमदारांची नावे मंत्रिपदासाठी…वाचा सविस्तर
ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांचंही असंच मत आहे, आता यूएस आर्मीचे प्रभारी पीट हेगसेथ यांनीही तृतीयपंथीयांबद्दल नकारात्मक विचार केलाय. त्यांनी असा युक्तिवाद केलाय की, सैन्यात महिला आणि ट्रान्सजेंडर लोकांना समाविष्ट करण्याच्या हालचालींमुळे अमेरिकन सुरक्षा कमकुवत होत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, ट्रम्पचे उपाध्यक्ष बनलेल्या जेडी वन्स यांनी ट्रान्सजेंडर आणि नॉनबायनरी लोकांवर वादग्रस्त टिप्पण्या करून वाद निर्माण केला. ते म्हणाले की, आयव्ही लीग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी काही गोऱ्या मुलांना ट्रान्स होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.