Gaza Attack: हमासविरुद्धच्या युद्धादरम्यान इस्त्रायलने (Israel)शरणार्थी शिबिरावर हल्ला केला. गाझा (Gaza)येथील शाळेवर इस्रायली लढाऊ विमानांनी केलेल्या हल्ल्यात 32 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये 14 मुलं होती. हमास या शाळेत इतर ठिकाणाहून दहशतवादी कारवाया करत असल्यानं या शाळेवर हल्ला करण्यात आल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे. या हल्ल्यात लहान मुलं आणि महिलांचाही मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामध्ये किमान 39 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांकडून देण्यात आली आहे. त्याचवेळी पॅलेस्टाईन न्यूज एजन्सीनं या हल्ल्यात 32 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त दिलं आहे.
महाराष्ट्रात मराठा खासदरांची संख्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त, बबनराव तायडेंनी सांगितली आकडेवारी
इस्रायली लष्करानं सांगितलं की, त्यांच्या लढाऊ विमानांनी पॅलेस्टिनींना मदत करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळेवर हल्ला केला. हल्ल्यानंतर, इस्रायली सैन्यानं पुरावे सादर न करता दावा केला की हमास आणि इस्लामिक जिहादने त्यांच्या कारवायांसाठी शाळेचा वापर केला. लष्करानं सांगितलं की, हल्ल्यापूर्वी ड्रोनद्वारे पाळत ठेवणे आणि अतिरिक्त गुप्तचर गोळा करणे यासह नागरिकांच्या सुरक्षेसाठी अनेक महत्त्वाची पावलं उचलण्यात आली.
नुसिरत निर्वासित शिबिर गाझा पट्टीच्या मध्यभागी आहे. 1948 मध्ये अरब-इस्रायल युद्धादरम्यान बांधलेली ही पॅलेस्टिनी निर्वासित छावणी आहे. इस्रायली सैन्यानं शाळेच्या छतावर संयुक्त राष्ट्र लिहिलेलं शाळेचे फोटो शेअर केले आहेत. ग्राफिक्समध्ये शाळेच्या वरच्या मजल्यांना टार्गेट करुन झालेल्या हल्ल्याची माहितीही देण्यात आली आहे.
गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलमध्ये घुसून हल्ला केला होता, त्यात सुमारे 1 हजार 160 लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बहुतांश इस्रायली नागरिकांचा समावेश आहे. हल्ल्यानंतर हमासच्या दहशतवाद्यांनी 250 हून अधिक इस्रायली आणि परदेशी नागरिकांना बंदी बनवून गाझामध्ये नेलं होतं. या संघर्षादरम्यान हमासनं काही बंदीवानांची सुटका केली असली तरी, इस्रायलचा आरोप आहे की 99 बंदी अजूनही हमासच्या ताब्यात आहेत.