Global Layoffs : जगभरात पुन्हा एकदा अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात (Global Layoffs) सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. यामध्ये ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि स्टुडिओ बिझनेस यांनी आतापर्यंत शेकडो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्याचबरोबर गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने देखील कॉस्ट कटिंगसाठी अनेक व्हर्टीकल्समधून कर्मचारी कपात केली.
आनंदवार्ता! यंदाच्या वर्षी भारतीय नोकरदारांना मिळणार बंपर Increment : सर्व्हे
ॲमेझॉनमध्ये स्ट्रीमिंग व्हिडिओ आणि स्टुडिओ डिव्हिजनचे प्रमुख माईक हॉपकिंस यांनी बुधवारी एक मेल पाठवला. ज्यामध्ये त्यांनीही घोषणा केली की, कंपनीमध्ये कर्मचारी कपात केली जात आहे. तर यामध्ये अमेरिकेतील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच इतर देशांमधील कर्मचाऱ्यांना देखील येथे आठवड्याभरात ही नोटीस पाठवली जाईल.
जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडसोबत सारा तेंडुलकरची पार्टी; संतापलेल्या अभिनेत्रीने उचललं हे पाऊल
यामध्ये ॲमेझॉनकडून तब्बल 35 टक्के स्टाफ कमी करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी 500 कर्मचारी होते. 2022 पासून कंपनीकडून अशा प्रकारची कर्मचारी कपात सुरू झाली आहे. ज्यामध्ये आत्तापर्यंत तब्बल 27 हजार हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे ॲमेझॉनच्या इतिहासातील ही सगळ्यात मोठी कर्मचारी कपात मानली जात आहे.
तर दुसरीकडे गुगलने देखील डिजिटल असिस्टंट हार्डवेअर आणि इंजीनियरिंग या टीममधून कर्मचारी कपात केली आहे. ज्यामध्ये व्हॉइस बेस गुगल असिस्टंट आणि ऑर्गुमेंट रियालिटी हार्डवेअर टीम यामधील कर्मचारी समाविष्ट आहेत. कंपनीकडून सांगण्यात आलं आहे की, या कपातीचा परिणाम सेंट्रल इंजिनिअरिंग ऑर्गनायझेशन टीमच्या कर्मचाऱ्यांवर देखील होईल.
त्यावर गुगलच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आला आहे की, आमच्या टीमला अधिक कुशल बनवण्यासाठी आणि चांगलं काम करण्यासोबतच कंपनीच्या संसाधनांना प्राथमिकता देण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. दरम्यान अल्फाबेट वर्कर्स युनियन या कर्मचारी संघटनेने सोशल मीडिया साईट एक्स यावर पोस्ट करत या कर्मचारी कपातीचा निषेध करत त्याविरुद्ध विरुद्ध आवाज उठवला आहे.