आनंदवार्ता! यंदाच्या वर्षी भारतीय नोकरदारांना मिळणार बंपर Increment : सर्व्हे

  • Written By: Published:
आनंदवार्ता! यंदाच्या वर्षी भारतीय नोकरदारांना मिळणार बंपर Increment : सर्व्हे

Korn Ferry Survey On 2024 Year Salary Increment In India : जगभरात पुन्हा एकदा विविध क्षेत्रातून नोकर कपाती सुरू करण्यात आली आहे. जगभरातील दिग्गज कंपन्या असणाऱ्या Amazon (Amazon.com) ने प्राइम व्हिडिओ आणि स्टुडिओ व्यवसायातील अनेक कर्मचाऱ्यांना कमी करण्यास सुरूवात केली आहे. याशिवाय Google ची मूळ कंपनी असणाऱ्या Alphabet Inc. देखील खर्चात कपात करण्यासाठी अनेक वर्टिकलमधील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे नोकरी जाण्याची टांगती तलवार असताना मात्र, भारतीय नोकरदारांसाठी एक आनंदवार्ता समोर आली आहे. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे निरीक्षण जागतिक बँकेने नोंदवले आहे. याचा थेट फायदा यंदाच्या पगारवाढीत (Salary Increment) दिसून येईल असा अंदाज करण्यात आलेल्या एका सर्व्हेक्षणातून वर्तवण्यात आला आहे.

भाजपमध्ये स्थिरावलेल्या नार्वेकरांनीही दोनदा ठोकला आहे राजकीय पक्षांना रामराम

जगभरात मंदीचे सावट असताना भारतीय अर्थव्यवस्था तेजीत आहे. त्यामुळे यावेळीदेखील जागतिक बँकेसह अनेक संस्थांनी भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील असे निरीक्षण नोंदवले आहे. याचा फायदा नोकरदार वर्गाला होणार असून, यंदाच्या वर्षी आशिया-पॅसिफिकमध्ये सर्वाधिक पगारवाढ मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कॉर्न फेरीच्या इंडिया कॉम्पेन्सेशन सर्व्हेनुसार हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सर्व्हेक्षणानुसार, गेल्यावर्षी आशिया पॅसिफिकमधील कंपन्यांतर्फे कर्मचाऱ्यांना 9.5 टक्के इतकी पगारवाढ देण्यात आली होती.मात्र, यंदाच्या वर्षी कंपन्या सरासरी 9.7 टक्के पगारवाढ देऊ शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चांगल्या कर्मचाऱ्यांना सोबत ठेवण्यासाठी गेल्यावेळपेक्षा ही बंपर पगारवाढ देण्याच्या विचार करत आहे.

डॉक्टरांच्या वेड्या वाकड्या अक्षरावर HC नाराज; PM रिपोर्टसह सर्व गोष्टी कॅपिटलमध्ये लिहिण्याचे आदेश

जगभारातील देशांत यंदाच्या वर्षी देण्यात येणाऱ्या पगारवाढीत भारत सध्या अग्रस्थाही असून, व्हिएतनाममध्ये यंदाच्या वर्षी सरासरी 6.7 टक्के पगारवाढ अपेक्षित आहे. तर, इंडोनेशियामध्ये यंदा सरासरी 6.5 टक्के पगारवाढ अपेक्षित आहे. यावर्षी जपानमधील कर्मचाऱ्यांना सर्वात कमी 2.5 टक्के पगारवाढ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संदीप माहेश्वरींनी बाजार उठवलेल्या विवेक बिंद्रांचे बिझनेस मॉडेल नेमके कसे होते?

कोणत्या क्षेत्रात मिळणार सर्वाधिक हाईक?

706 कंपन्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, 2024 मध्ये फायनान्शियल सर्व्हिसेस, ग्लोबल कॅपेब्लिटी सेंटर्स अँड प्रॉडक्ट्स असणाऱ्या कंपन्या, केमिकल सेक्टर, इंडस्ट्रियल गुड्स आणि रिटेल इंडस्ट्रिजमध्ये सर्वाधिक 10 टक्के पगारवाढ अपेक्षित आहे. ऑटोमोटिव्ह क्षेत्रात 9.7 टक्के, बांधकाम आणि बांधकाम साहित्यात 9.6 टक्के, लाइफ सायन्सेस आणि हेल्थ केअरमध्ये 9.5 टक्के, ऑईल अँड गॅस सेक्टरमध्ये 9.5 टक्के, कंज्यूमर गुड्समध्ये 8.7 टक्के आणि IT सेक्टरमध्ये 7.8 टक्के वेतनवाढीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज