Impact on Trump Tariff after American Federal Circuit Court of Appeal decision : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के कर लादण्याची घोषणा केली होती. त्यानंतर बुधवार 27ऑगस्टला मुदत संपल्या पासून भारतावर एकूण एकूण 50 टक्के कर लादण्यात आला आहे. ट्रम्प यांचे हे अतिरिक्त कर धोरण अमेरिकेसह जगाला नुकसानकारक ठरत आहे. त्यातच आता अमेरिकेच्या फेडरल सर्किट कोर्ट ऑफ अपीलने डोनाल्ड ट्रम्प यांना या कर धोरणावरून चांगलेच फटकारले आहे.
जरांगेंनी नाक दाबताच BMC आयु्क्त लागले कामाला; फोटो टाकत दिली सुविधांची माहिती
अमेरिकन फेडरल कोर्टाने काय म्हटले?
कोर्टाने राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना विविध देशांवर लावलेल्या टॅरिफवरून फटकारले आहे. कोर्टाने या सुनावणीमध्ये म्हटले आहे की, 1977 च्या इंटरनॅशनल इमरजन्सी इकॉनॉमिक पॉवर्स अॅक्टचा गैरवापर केला जात आहे. कॉंग्रेस राष्ट्रपतींना अशाप्रकारे अमर्याद टॅरिफ लावण्याचा अधिकार देत नाही. मात्र तरीही ट्रम्प यांनी टॅरिफ थांबवलेला नाही. तसेच प्रशासनाला वरच्या कोर्टात जाण्यासाठी वेळ दिला आहे.
ट्रम्प यांची प्रतिक्रिया
या निर्णयामुळे ट्रम्प यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. ट्रम्प (Donald Trump) यांनी त्यांच्या या अतिरिक्त कर धोरणाचे समर्थन केले आणि लढत राहण्याचे आश्वासन दिले आहे.यावेळी बोलताना ट्रम्प म्हणाले की, टॅरिफ लावणे चुकीचे असल्याचे म्हणणारा कोर्टाचा हा निर्णय अमेरिकेला नुकसानकारक ठरणार आहे. हा निर्णय अमेरिकेला विनाशाकडे घेऊन जाईल. असं म्हणत ट्रम्प (Donald Trump) यांनी कोर्टाच्या या निर्णयाचा विरोध केला आहे तर टॅरिफ धोरणाचे समर्थन केले आहे.
मुंबईत जरांगेंचं उपोषण; शिंदे मात्र दरेगावच्या वाटेवर, राजकीय तर्कवितर्कांना उधाण
कोर्टाच्या या निर्णयाचा ट्रम्प टॅरिफवर काय परिणाम होईल?
ट्रम्प सरकारने असा युक्तिवाद केला आहे की, जर ट्रम्प यांचे हे टॅरिफ धोरण (Donald Trump) रद्द केले तर अमेरिकेला वसूल केलेल्या काही करांचा परतावा द्यावा लागू शकतो. ज्यामुळे अमेरिकन तिजोरीला आर्थिक फटका बसू शकतो. जुलैपर्यंत आयात शुल्कातून मिळणारे उत्पन्न 159 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके झाले होते, जे गेल्या वर्षीच्या त्याच महिन्याच्या टप्प्यापेक्षा दुप्पट आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने या महिन्यात या सुनावणी संदर्भात असा इशारा दिला होता की हे टॅरिफ धोरण रद्द करण्याचा निर्णय अमेरिकेसाठी ‘आर्थिक विनाशाचे’ कारण ठरू शकतो.
कोर्टाच्या या निर्णयामुळे ट्रम्प (Donald Trump) यांना पुढे टॅरिफ लादण्याचा प्रयत्न करताना अडचणी येऊ शकतात. तरीही ट्रम्प यांच्याकडे टॅरिफ लादण्यासाठी पर्यायी कायदे आहेत. परंतु ते ट्रम्प यांच्या कर लावण्याच्या कृतीचा वेग आणि तीव्रता मर्यादित करतील हे मात्र नक्की.