Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास यांच्यात यु्द्ध सुरू (Israel Hamas War) असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. इस्त्रायलने मोठी (Isreal Attack) कारवाई केली आहे. हमास दहशतवादी संघटनेचा (Hamas) प्रमुख इस्माईल हनियाला इराणची राजधानी तेहरान (Tehran) येथे ठार करण्यात आले. इराणच्या आयआरजीसीने दिलेल्या निवेदनात याची खात्री करण्यात आली आहे. इराणची राजधानी तेहरान शहरात हनिया (Ismail Haniyeh) यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. या कारवाईत हनिया आणि त्यांच्या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार इराणच्या इस्लामिक रिवॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) या कारवाईला दुजोरा दिला आहे. आयआरजीसीने सांगितले की हा हल्ला बुधवारी सकाळी झाला. या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येत आहे. या घटनेवर शोक व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या हल्ल्यामागे इस्त्रायलचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Hamas Political Bureau Chief Ismail Haniyeh killed in Tehran: Islamic Revolutionary Guard Corps confirms
Read @ANI Story | https://t.co/WNM8oiMoI2#Hamas #Iran #IRGC #IsmailHaniyeh pic.twitter.com/kHh9uLlC8C
— ANI Digital (@ani_digital) July 31, 2024
इराणच्या नवीन राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्यात इस्माईल हनिया हजर होता. तसेच इराणच्या सर्वोच्च नेत्याबरोबरही बैठक झाली होती. या घडामोडीनंतर हा हल्ला झाला आणि या हल्ल्यात हनिया मारला गेला. या हल्ल्याची जबाबदारी अजून कुणीच घेतलेली नाही. परंतु, इस्त्रायलवर संशय व्यक्त केला जात आहे. कारण इस्त्रायलने 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यांनंतर इस्माइल हनिया आणि या संघटनेच्या अन्य नेत्यांना ठार मारण्याची शपथ घेतली होती. या हल्ल्यांत 1200 लोक मारले गेले होते आणि 250 लोकांना कैद करण्यात आले होते.
Gaza Attack : इस्त्रायली सैनिकांचा गाझामधील शाळेवर हल्ला; नरसंहारात 32 जणांचा मृत्यू
हानिया मंगळवारी इराणच्या राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्यासाठी तेहरानमध्ये आले होते. यानंतर त्यांच्या घरावर हल्ला झाला आहे. आता हा हल्ला कसा झाला त्यात हनियाचा मृत्यू कसा झाला याची माहिती इराणच्या सरकारने अजून दिलेली नाही. परंतु, या कारवाईने अरब जगतात मोठी खळबळ उडाली आहे. इराणी सरकारी टीव्हीवर विश्लेषकांनी या हल्ल्यासाठी इस्त्रायलला दोषी ठरवले आहे. असे असले तरी इस्त्रायलने अजून यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. व्हाईट हाऊसकडूनही कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. ही घटना अशावेळी घडली आहे ज्यावेळी बायडन प्रशासन इस्त्रायल आणि हमास यांच्यातील यु्द्ध रोखण्याचा प्रयत्न करत आहे.
गाझाच्या आरोग्य मंत्रालयानुसार ऑक्टोबर महिन्यातील हल्ल्यानंतर आतापर्यंत 39 हजार 360 पेक्षा जास्त पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत आणि 90 हजार 900 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर जगभरात खळबळ उडाली आहे. आता हमासकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.