इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई (Israel Iran War) अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यात ठार झाले. फक्त आयातुल्ला अली खामेनेई हेच नाही तर त्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य मारले गेले. इराणवर अमेरिका आणि इस्त्रायलने हल्ला केला. त्यांच्या निशाण्यावर सुरूवातीपासूनच आयातुल्ला अली खामेनेई होते. शेवटपर्यंत आयातुल्ला अली खामेनेई यांना इराणची सत्ता सोडण्यासाठी अमेरिकेकडून धमकावले जात होते. शेवटी अमेरिकने आयातुल्ला अली खामेनेई यांना ठार केले. इराणचे लष्कर, सरकारी वृत्तसंस्था आयआरएनए आणि मुख्य वृत्तवाहिनी प्रेस टीव्हीने आता अधिकृतपणे अयातुल्ला अली खमेनी यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.
एका निवेदनात, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने इमाम खमेनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांना श्रद्धांजली वाहिली. संघटनेने त्यांच्या मृत्युला महान नेता शहीद म्हणून वर्णन केलं. त्याचबरोबर त्यांच्या मार्गावर आम्ही पुढ जाऊ असं म्हटलं. त्याचबरोबर त्यांच्या मृत्यूला अमेरिका आणि झिओनिस्ट राजवटीला दोषी ठरवण्यात आलं आहे. तसंच, या घटेनंतर कठोर कारवाई आणि बदला घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर जनतेला राष्ट्रीय एकता आणि ताकद दाखवण्याचं आवाहनही आपल्या निवेदनात करण्यात आलं आहे.
