Download App

गाझामध्ये नरसंहार सुरुच, इस्रायल सैन्याकडून पुन्हा हल्ला, 30 पॅलेस्टिनींचा मृत्यू, शेकडो जखमी…

Attack by Israel army in Gaza : दक्षिण गाझामधील रफाह येथे इस्त्रायली सैन्याने केलेल्या गोळीबारात किमान ३० पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत.

Attack by Israel army in Gaza : इस्रायलच (Israel) गाझामध्ये नरसंहार सुरुच आहे. 26 मे रोजी इस्त्रायलने गाझामध्ये अनेक ठिकाणी हल्ले केले होते. त्यानंतर आज दक्षिण गाझामधील (Gaza ) रफाह येथे अमेरिकेच्या निधीतून उभारण्यात आलेल्या मदत वितरण केंद्राजवळ इस्त्रायली सैन्याने गोळीबार (Firing) केला. या गोळीबारात किमान ३० पॅलेस्टिनी नागरिक ठार झाल्याचे वृत्त आहे. मदत केंद्राजवळ हजारो पॅलेस्टिनी नागरिक जमले असताना ही घटना घडल्य़ाची माहिती आहे.

पुण्यात राष्ट्रवादीचे दोन शहराध्यक्ष ! पूर्वला सुनील टिंगरे तर पश्चिमला सुभाष जगताप यांची नियुक्ती 

गाझामध्ये इस्रायलची क्रूरता

रविवारी सकाळी इस्रायली सैन्याने बेछूट गोळीबार केला. गोळीबारात किमान ३० पॅलेस्टिनी ठार तर १३० हून अधिक जण जखमी झाले, असे गाझा मदत कर्मचाऱ्यांनी सांगितले. हे लोक अमेरिकेने मदतीसाठी उभारलेल्या वितरण केंद्राकडे जात होते. त्याचवेळी इस्रायली सैनिकांनी गोळीबार केला. घटनास्थळावरून मृतांचे आणि जखमींचे मृतदेह वाहून नेण्यात आले आहेत. रफाहजवळ झालेल्या हल्ल्यानंतर जखमी पॅलेस्टिनी नागरिकांवर नासेर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको…किमान 10 जूनपर्यंत पावसात घट 

या हल्ल्याबाबत नागरी संरक्षण विभागाचे प्रवक्ते महमूद बसल म्हणाले, इस्रायली सैन्याने गाझामधून माघार घ्यावी. कारण आजही रफाहच्या पश्चिमेकडील अमेरिकन रिलीफ सेंटरकडे जाणाऱ्या हजारो लोकांवर इस्रायली वाहनांमधून गोळीबार करण्यात आला, ज्यामध्ये किमान ३० लोक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले. इस्रायलने यापूर्वीही असे अनेकदा हल्ले केले आहेत, ज्यात अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमावले लागले होते.

दरम्यान, या हल्ल्याबाबत इस्रायलने कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. दुसरीकडे, हमासने युद्धबंदी प्रस्तावात सुधारणा करण्याची मागणी केली आहे. मात्र, अमेरिकेने तसे करण्यास नकार दिला आहे.

हमासने काय म्हटले?

हमासने ताज्या प्रस्तावाला प्रतिसाद देत म्हटले आहे, की ते १० जिवंत ओलिसांना सोडण्यास आणि १८ मृत ओलिसांचे मृतदेह परत करण्यास तयार आहेत. त्या बदल्यात, ते युद्ध पूर्णपणे थांबवावे, इस्रायली सैन्याने गाझामधून माघार घ्यावी, असं हमासने म्हटलंय

follow us