Download App

Israel Hamas War : लेबनॉनवरील कारवाई महागात! इस्त्रायलवर 100 रॉकेट डागत मोठा हल्ला

Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अजूनही (Israel Hamas War) थांबलेले नाही. अधूनमधून युद्धाच्या बातम्या येत असतात. पण, आता युद्धाच्या मैदानातून मोठी बातमी आहे. लेबनॉनवर इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यांना (Israel Attack) प्रत्युत्तर म्हणून हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलवर तब्बल 100 रॉकेट डागले. या हल्ल्यात इस्त्रायलचे जास्त नुकसान झाले नाही. मात्र एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.  या हल्ल्यानंतर इस्त्रायलनेही प्रत्युत्तर दिल्याने संघर्ष अधिकच चिघळला आहे.

Israel Attack : दहशतवादी समजून निर्वासितांच्या छावण्यांवर इस्त्रायलचा स्ट्राईक; 11 ठार

इरानचे समर्थन असलेल्या हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेने हे रॉकेट हल्ले केल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला. पाच महिन्यांच्या युद्धात हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. यानंतर चिडलेल्या इस्त्रायलनेही प्रत्युत्तर दिले. बालबेक भागात हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक गोदाम नष्ट झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात दहशतवादी संघटनेचे दोन कमांड सेंटर नष्ट झाल्याची माहिती इस्त्रायलने दिली.

दरम्यान, 7 ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे. युद्धात मोठं नुकसान झालं आहे. हजारो लोकांचा बळी (Israel Palestine Conlflict) गेला आहे. या युद्धाचे चटके जगालाही बसू लागले होते. आतापर्यंत या युद्धात दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. शाळा,  कॉलेज, निवासी इमारती, रुग्णालयांचे प्रचंड नुकासान झाले आहे. तसेच दोन्ही बाजूच्या हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तरीदेखील युद्धाचा निकाल लागलेला नाही. आताही येथील परिस्थितीच चिघळलेलीच आहे. युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत मात्र अद्याप यश मिळालेले नाही.

Israel Hamas War : गाझातील लोकांची हेळसांड थांबवा; कमला हॅरिस यांची युद्धविरामाची मागणी

या युद्धात दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. पाच महिने होत आले तरीही युद्धाचा निकाल लागलेला नाही. युद्धामुळे परिसराचीही मोठी हानी झाली आहे. या गोष्टींचा विचार मात्र दोन्ही बाजूंनी होत नाही. युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही प्रयत्न केले जात आहेत. मात्र त्याचा उपयोग होताना काही दिसत नाही. युद्ध अजूनही थांबलेलं नाही.
follow us