Download App

Israel Hamas War : गाझावर व्यक्त व्हायला शब्द नाहीत; डब्लूएचओच्या प्रमुखांकडून इस्त्रालयची कानउघडणी

Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अजूनही ( Israel Hamas War ) थांबलेले नाही. अधूनमधून युद्धाच्या बातम्या येत असतात. या दरम्यान आता इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे गाझातील झालेल्या परिस्थितीवर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ॲधानोम घेब्रेयसस यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत लिहिलं की, गाझावर व्यक्त व्हायला शब्द नाहीत.

Nilesh Lanke : लोकसभेसाठी लंकेंची जनसंवाद यात्रा! जयंत पाटलांसह राऊतांच्या उपस्थितीत शुभारंभ

नेमकं काय म्हणाले डब्लूएचओचे प्रमुख?

गाझामध्ये जेथे इस्त्रायलने हल्ला केला. त्या रुग्णालयामध्ये 107 रुग्ण होते. त्यांच्याकडे अत्यावश्यक गोष्टी कमी होत्या. मेडिकल, अत्यावश्यक वस्तू, रुग्णालय कर्मचारी यांची कमतरता आहे. तसेच रुग्णांमध्ये चार लहान मुलं यांच्यासह 28 इतर लोक गंभीर जखमी आहेत. त्यामुळे इस्त्रायलने तात्काळ अशा प्रकारचे हल्ले थांबवावे आणि सीजफायर करावे अशी मागणी डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी केले आहे. तसेच त्यांनी यावेळी म्हटले आहे की, गाजातील परिस्थितीवर बोलण्यासाठी शब्द देखील नाही.

कमला हॅरिस यांची युद्धविरामाची मागणी

या अगोदर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी देखील गाझामधील लोक भुकेने तहानेने मरत आहेत. ही सर्व परिस्थिती मानवतेच्या विरुद्ध असल्याने गाझामध्ये तात्काळ युद्धविराम व्हावा. अशी मागणी केली होती. त्या म्हणाल्या की, गाझामधील लोक भुकेने आणि तहाने मरत आहेत. तेथील परिस्थिती अतिशय भयावह आणि मानवतेच्या विरुद्ध आहे.

बॉक्स ऑफिसवर ‘क्रू’ची हाफ सेंचुरी; तीन दिवसात बजेटचे पैसे वसूल, किती केली कमाई?

तसेच त्यांनी यावेळी इस्त्रायल गाझामधील मानवतावादी विध्वंस कमी करण्यासाठी पुरेशी पावलं उचलण्यास सांगितलं आहे. तर या परिस्थितीसाठी त्यांनी इस्त्रायलला जबाबदार धरले. तसेच त्यांनी इस्त्रायलला आपल्या सीमा उघडल्या जाव्यात आणि मदतीवर कोणतेही निर्बंध लादले जाऊ नयेत असं ही सांगितलं आहे.

follow us