बॉक्स ऑफिसवर ‘क्रू’ची हाफ सेंचुरी; तीन दिवसात बजेटचे पैसे वसूल, किती केली कमाई?

बॉक्स ऑफिसवर ‘क्रू’ची हाफ सेंचुरी; तीन दिवसात बजेटचे पैसे वसूल, किती केली कमाई?

Crew Box Office Collection Day 3: तब्बू (Tabu), करीना कपूर (Kareena Kapoor) आणि क्रिती सेनॉनचा (Kriti Sanon) ‘क्रू’ (Crew Movie) चित्रपट 29 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्याला समीक्षक आणि प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) हिट ठरला. पहिल्या दिवशी जगभरात 20 कोटींहून अधिक कमाई केली. हा सिनेमा प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. अशा परिस्थितीत, रिलीज होऊन तीन दिवस उलटले आहेत आणि पहिल्या वीकेंडमध्ये सिनेमाने तुफान कमाई केली आहे. चित्रपटाने जगभरात अर्धशतक ओलांडले आहे. चला मग पाहूया एकूण कलेक्शन केली झाले.

sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘Crew’ ने रविवारी मोठा गल्ला कमावला आहे. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या रविवारी या चित्रपटाने 11 कोटींचा व्यवसाय केला आहे, त्यानंतर तिन्हींची कमाई भारतात 29.25 कोटींच्या आसपास पोहोचली आहे. हे अद्याप प्राथमिक आकडे आहेत. अधिकृत आकडेवारी जाहीर झाल्यानंतर यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

‘क्रू’ ने भारतात 10.28 कोटींची जबरदस्त ओपनिंग केली होती, त्यानंतर चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिल्या शनिवारी 10.87 कोटींचा व्यवसाय केला होता. त्याचवेळी, आता तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी मोठी झेप नोंदवण्यात आल्याचे बोलले जात आहे, त्यानंतर या चित्रपटाने जगभरात 55 कोटींचा व्यवसाय केल्याचे वृत्त आहे. मात्र, अधिकृत आकडेवारी येण्याची वाट पाहावी लागणार आहे.

Bhumi Pednekar: ‘फीमेल लीड प्रोजेक्ट’ हा शब्द मला अजिबात आवडत नाही’, अभिनेत्री थेटच बोलली

हा चित्रपट 60 कोटींच्या बजेटमध्ये बनला

‘क्रू’च्या बजेटबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट जवळपास 60 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अशीच कमाई सुरू राहिली तर सोमवारी म्हणजेच चौथ्या दिवशी तो 60 कोटींचा टप्पा पार करेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जर आपण त्याच्या कथेबद्दल बोललो तर, यात एका एअर होस्टेसची कथा दाखवली गेली आहे, जी जीवनातील संघर्षांमुळे त्रस्त आहे. तसेच त्याची कथा विजय मल्ल्याशी जोडली गेली आहे. त्याची फसवणूक आणि बँक भ्रष्टाचाराची कहाणीही त्यात पाहायला मिळणार आहे.

करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉन अभिनीत हा चित्रपट 2500 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या माध्यमातून तीन अभिनेत्रींचे त्रिकुट पहिल्यांदाच पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज