हॉंगकॉंगमध्ये राहिवासी इमारतीला भीषण आग; 44 जणांचा होरपळून मृत्यू 300 जण बेपत्ता

Hong Kong मधील तैपे येथे इमारतींना आग लागल्याची धक्कादायक घटना घडली यामध्ये आतापर्यंत तब्बल 44 लोकांचा मृत्यू अन् 300 लोक बेपत्ता आहेत.

Hong Kong

Hong Kong

Massive fire breaks out at residential building in Hong Kong 44 people die, 300 missing : हॉंगकॉंगमधील तैपे या ठिकाणी एकाच वेळी तब्बल सात इमारतींना आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी दुपारी ही आग लागल्याचे सांगितलं जात आहे. ज्यामध्ये आतापर्यंत तब्बल 44 लोकांचा मृत्यू झाला असून अद्यापही तीनशे लोक बेपत्ता आहेत. याबाबत पोलिसांनी तीन संशयतांना अटक केली आहे.

आमची युती भविष्यातील नांदी… शिवसेना अन् शरद पवारांच्या पक्षाच्या युतीनंतर प्रदेशाध्यक्ष शिंदेंचं मोठं विधान

ही आग एवढी भीषण होती की, यामध्ये अनेक लोक बिल्डिंगमधून बाहेरच येऊ शकले नाहीत. याबाबत फायर सर्व्हिसेस डिपार्टमेंट कडून माहिती देण्यात आली की. बुधवारी 26 नोव्हेंबरच्या दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही आग लागण्याची घटना घडली. त्यानंतर साडेतीन वाजेपर्यंत तब्बल चार अलार्म फायर वाजले. जे हॉंगकॉंग मधील दुसरे मोठे अलार्म सांगितले जात आहेत. जे अत्यंत मोठी दुर्घटना झाल्यानंतर वाजतात.

कुणाला कष्टाचं फळ तर कुणाला खरेदीचे योग कसं आहे 27 नोव्हेंबरचं राशीभविष्य?

या घटनेनंतर अद्यापही बचाव कार्य आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये 90% लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र अनेक जण बेपत्ता आहेत. या घटनेनंतर अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. ही घटना हॉंगकॉंगमधील सर्वात मोठी दुर्घटना घटना मानली जात आहे. घटनेनंतर आसपासच्या इमारतीतील लोकांना फायर विभागाकडून घरातच राहण्याचे आणि घरांच्या खिडक्या-दरवाजे बंद ठेवून शांतता राखण्याचं आवाहन केले जात आहे.

शिंदे गटाचे आमदार निलेश राणेंनी भाजपला उघड पाडलं, व्हिडिओ करत केली पोलखोल

या अगोदर हॉंगकॉंगमध्ये जवळपास 17 वर्षांपूर्वी अशा प्रकारची भीषण आग लागली होती. मात्र त्यावेळी चार जणांचा यामध्ये मृत्यू झाला होता. मोठं नुकसान देखील झालेले नव्हतं. मात्र यावेळी लागलेली आहे अत्यंत भयावह असून यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आ.हे यासाठी प्रशासनाने जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी एक हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे.

Exit mobile version