Download App

Nepal Protest : नेपाळची संसद पेटवली! आंदोलन भडकावणारा ‘सुंदान गुरुंग’ आहे तरी कोण?

नेपाळमध्ये आंदोलनाने हिंसक वळण घेतलं असून आंदोलकांनी संसद पेटवल्याचं चित्र आहे. हे आंदोलन भडकावणारा सुंदान गुरुंग नेमका आहे तरी कोण?

Nepal Protest Who is Sundan Gurung : नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर तरुणाईने केलेल्या आंदोलनामुळे (Nepal Protest) नेपाळमध्ये सध्या परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर बंदी आणि भॅष्टाचारांच्या आरोपांमुळे जवळपास सर्वच तरुण रस्त्यावर उतरले असून संसद भवनाबाहेर निदर्शने सुरु आहेत. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आज या आंदोलकांनी नेपाळची संसद पेटवल्याची चित्र पाहायला मिळालंय. अशातच नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक आणि पंतप्रधान के.पी. ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलायं. तरुणांचं हे आंदोलन एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलंय, तो सामाजिक कार्यकर्ता म्हणजे सुंदान गुरुंग (Sundan Gurung). आंदोलनाद्वारे थेट पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

चाललंय काय? चक्क कैदी धुतोय जेलरची गाडी, बीड कारागृहातील आणखी एक प्रताप! Video Viral

नेपाळमध्ये 2015 साली भूकंपाची घटना घडली. या घटनेमध्ये सुंदान गुरुंग यांनी आपल्या गमावलं. त्यानंतर ‘हामी नेपाल’ नामक संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे अध्यक्ष सुंदान गुरुंग बनले. आपल्या मुलाचा भूकंपाच्या घटनेत जीव गेल्यानंतर सुंदान गुरुंग यांनी आपल्या जीवनाची दिशाच बदलली. ते सातत्याने विविध विषयांवर आंदोलन सुरु करु लागले. कधी भ्रष्टाचाराविरोधात तर कधी गैरकारभाराविरोधात ते अनेकदा आंदोलना उभे ठाकले. कालांतराने त्यांनी अनेक युवा तरुणांचा पाठिंबा मिळत गेला.

नेपाळमध्ये होत असलेला व्यापक भ्रष्टाचार, अर्थिक समानता आणि गैरकारभारामुळे अनेकांच्या मनात संतापाची लाट होती. अशातच नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घातल्याने त्यात आणखी भर पडली. सुंदान गुरुंग यांनी सर्व युवकांना एका मंचावर आणण्याचा विडा उचलला. सुदान यांनी नेपो बेबीज आणि कुलीन वर्ग यांच्या टीकेची तोफ डागली. 8 सप्टेंबरला झालेल्या आंदोलनासाठी गुरुंग यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टद्वारे त्यांनी तरुणांना आवाहन केलं.

अहिल्यानगरच्या जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या खेळाडू वरिष्ठ महिला महाराष्ट्र फुटबॉल संघात ; अध्यक्ष फिरोदियांनी दिल्या शुभेच्छा!

सुदान गुरुंग यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं, 8 सप्टेंबर हा दिवस नेपाळच्या युवकांसाठी महत्वाचा, आता युवक उठतील आणि आंदोलन करतील, ही वेळी आपली असून आपलीच लढाई आहे. ही लढाई युवकांपासूनच सुरु होईल, अशी पोस्ट गुरुंग यांनी केली होती. तसेच हम अपनी आवाज उठायेंगे, मुट्ठियां भीचेंगे, हम एकता की ताकद दिखायेंगे, उनको अपनी शक्ती दिखायेंगे जो नही झुकने का दंभ भरते है…. सुदान यांच्या या एका पोस्टनंतर नेपाळमधील अनेक तरुणांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं.

युवकांचा मसिहा…
दरम्यान, सुंदान गुरुंगची ताकद म्हणजे युवक आहेत. त्यांचे आंदोलन पूर्णपणे डिजिटल टूल्सवर आधारित असून सोशल मीडियावरुन गुंदान आंदोलनाची दिशा ठरवतात. हातात पुस्तके आणि शाळेच्या कपड्यांवर युवकांनी आंदोलनाला रस्त्यावर उतरण्याबाबतचे आदेश सुंदान यांनी दिले आहेत. नेपाळमध्ये सुरु असलेल्या या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं असून संसदेबाहेर जाळपोळच्या घटना घडत असल्याचं पाहायला मिळतंय.

follow us