Nobel Prize 2025 : भारत आणि पाकिस्तान (India And Pakistan) यांच्यासह डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक युद्ध थांबवल आहे त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना शांततेसाठी नोबेल पुरस्कार (Nobel Prize 2025 ) देण्यात यावा अशी मागणी व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट (Caroline Levitt) यांनी केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानसह जगभरातील अनेक संघर्ष संपवले असल्याचा दावा कॅरोलिय लेविट यांच्याकडून करण्यात आला आहे.
गुरुवारी व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी लेविट म्हणाल्या की, ट्रम्प यांनी थायलंड आणि कंबोडिया, इस्त्रायल आणि इराण, रवांडा आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, भारत आणि पाकिस्तान, सर्बिया आणि कोसोवो, इजिप्त आणि इथिओपिया यांच्यातील संघर्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपवला आहे. गुरुवारी व्हाईट हाऊसच्या पत्रकार परिषदेत लेविट म्हणाल्या की, ट्रम्प यांनी थायलंड आणि कंबोडिया, इस्रायल आणि इराण, रवांडा आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, भारत आणि पाकिस्तान, सर्बिया आणि कोसोवो आणि इजिप्त आणि इथिओपिया यांच्यातील संघर्ष संपवला आहे.
ट्रम्प यांनी आपल्या सहा महिन्यांच्या कार्यकाळात दरमहा सरासरी एक शांतता करार किंवा युद्धबंदीसाठी मध्यस्थी केली आहे. त्यामुळे ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याची हीच योग्य वेळ आहे. असं लेविट म्हणाल्या.
मोठी बातमी, महिला अत्याचार प्रकरणात माजी खासदार प्रज्वल रेवन्ना दोषी
30 वेळा भारत-पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा दावा
तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत तब्बल 30 वेळा भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यास मदत केली असल्याचा दावा केला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आठवड्यात लोकसभेत बोलताना जगातिल कोणत्याही नेत्याने ऑपरेशन सिंदूर थांबवण्यास सांगितले नसल्याचे सांगितले होते मात्र त्यानंतर देखील ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी केला असल्याचा दावा केला.