“आता 50 दिवसांच्या आत युद्ध थांबवा नाहीतर..”, डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट रशियाशी पंगा

50 दिवसांच्या आत युद्ध समाप्तीच्या संदर्भात काही झालं नाही तर रशियावर आणखी कडक निर्बंध (टॅरिफ) लादू असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.

Donald Trump And Vladimir Putin

Donald Trump Warns Russia : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही (Russia Ukraine War) थांबलेलं नाही. या युद्धात दोन्ही देशांचं मोठं नुकसान झालं आहे. युद्ध थांबावं यासाठी जगभरातून प्रयत्न केले गेले मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. आता पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) रशियाला गंभीर इशारा दिला आहे. 50 दिवसांच्या आत युद्ध समाप्तीच्या संदर्भात काही झालं नाही तर रशियावर आणखी कडक निर्बंध (टॅरिफ) लादू असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.

ट्रम्प पुढे म्हणाले, यावेळी अमेरिका रशियावर 100 टक्के सेकेंडरी टॅरिफ आकारील. व्हाइट हाउसमधील एका बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. मी व्यापाराचा उपयोग अनेक गोष्टींसाठी करतो. यातून जर युद्ध थांबत असेल तर चांगली गोष्ट आहे. मी पुतिन यांना खूनी म्हणू इच्छित नाही. परंतु, ते एक कठोर व्यक्ती आहेत. मी राष्ट्रपती पुतिन यांच्या व्यवहाराने निराश झालो आहे. मला वाटत होतं की आम्ही दोन महिन्यांपूर्वी युद्ध समाप्तीच्या दिशेने करार करू. मला वाटत होतं की पुतिन जे बोलतात ते करतात. पुतिन खूप चांगल्या पद्धतीने बोलतात नंतर मात्र लोकांवर बॉम्ब टाकतात. मला या गोष्टी आजिबात आवडत नाही.

रशियाने भारताला दणका दिलाच! पाकिस्तान अन् रशिया मोठी डील, करारावर सह्या; नेमकं काय घडलं?

ट्रम्प यांनी याआधी सुद्धा सेकंडरी टॅरिफबाबत माहिती दिली होता. हा कर रशियाशी व्यापार करणाऱ्या देशांवर लादण्याचा इशारा त्यांनी दिला होता. नाटो संघटनेचे महासचिवांशी झालेल्या बैठकीतही ट्रम्प यांनी युक्रेनला शस्त्रपुरवठ्याच्या संदर्भात माहिती दिली होती. यामध्ये पॅट्रीयच मिसाइल सिस्टिमचाही समावेश होता. नाटो अमेरिकेकडून हत्यारे घेऊन युक्रेनला त्यांचा पुरवठा करील असेही ट्रम्प यांनी सांगितले होते.

रशियावर आणखी प्रतिबंधांचा विचार

ट्रम्प यांनी मागील आठवड्यात सांगितले होते की मी पुतिन यांच्यावर नाराज आहे. रशियावर अतिरिक्त प्रतिबंध लादण्याचा विचार करत आहे. निवडणूक प्रचाराच्या काळातही डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि यु्क्रेन यांच्यातील युद्ध लवकरच संपवण्याचे आश्वासन दिले होते. पुतिन यांनी शांततेच्यासंदर्भात चर्चा केली होती मात्र याच काळात युक्रेनच्या शहरांवर रशियाचे हल्ले सुरुच होते.

लोकसंख्या वाढीसाठी पुतीन यांचा अजब फतवा; अल्पवयीन मुली गर्भवती राहिल्यास लाखोंचं बक्षीस

follow us