Pakistan Missile Test : पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam terrorist attacks) भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan) तणाव वाढला. भारत-पाकिस्तान युद्धाची शक्यता वर्तवली जात असताना पाकिस्तानने अब्दाली क्षेपणास्त्राची (Abdali missile चाचणी केल्याचा दावा केलाय. पाकिस्तानने शनिवारी या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राची मारा क्षमता ४५० किलोमीटर असल्याचे सांगितले जातंय. अब्दाली क्षेपणास्त्राच्या चाचणीचा व्हिडिओही समोर आला आहे.
भारताकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यामुळे पाकिस्तान घाबरलाय आणि आता शक्तीप्रदर्शन करत भारताला चेतावणी देत आहे. पाकिस्तानचे म्हणणे आहे की पाकने जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या अब्दाली या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. ही चाचणी पाकिस्तानच्या लष्करी सराव INDUS चा एक भाग होती. पाकिस्तानच्या सोनमियानी रेंजमध्ये ही चाचणी करण्यात आली. या चाचणी दरम्यान पाकिस्तानी सैन्याचे स्ट्रेटेजिक फोर्स कमांडचे कमांडर लेफ्टनेंट जनरल मुहम्मद शाहबाज खान आणि स्ट्रेटेजिक प्लांस डिवीजनचे डीजी मेजर जनरल शहरयार परवेज बट उपस्थित होते.
दरम्यान, अब्दाली क्षेपणास्त्राला हत्फ-२ असेही म्हणतात. हे क्षेपणास्त्र पाकिस्तान अंतराळ संशोधन केंद्र (SUPARCO) आणि संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान संघटना (DESTO) यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. हे एकल-स्टेज, घन-इंधनयुक्त मोबाइल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असल्याचा दावा केला जातो. या मिसाइलची रेंज 450 किलोमीटर आहे. याशिवाय, हे क्षेपणास्त्र पेलोडसह ५०० किलोमीटर उडू शकते. या क्षेपणास्त्रात प्रगत पारंपारिक युद्धसामग्री (ICM) वाहून नेण्याची क्षमता आहे. हे क्षेपणास्त्र पारंपारिक स्फोटकांनी मोक्याच्या ठिकाणांना, लष्करी तळांना आणि शहरांना लक्ष्य करू शकते.
भारताने पाकिस्तानला दिला आणखी एक मोठा धक्का, सर्व प्रकारच्या पोस्टल- पार्सल सेवा बंद
असं मानलं जातंकी, अब्दाली क्षेपणास्त्र पाकिस्तान भारताच्या सीमावर्ती भागात तैनात करेल. हे क्षेपणास्त्र भारताच्या वायव्य भागांना लक्ष्य करू शकते.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख हाशिम मुसा म्हणून झाली आहे. तो पाकिस्तानी लष्कराचा माजी कमांडो असल्याचे वृत्त आहे.