Download App

बस रोखली, प्रवाशांना ताब्यात घेतले अन् हत्या केली; दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तान हादरला

Pakistan Bus Attack : पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बलुचिस्तान प्रांतात (Pakistan News) अज्ञात दहशतवाद्यांनी जवळपास 11 लोकांची हत्या केली. या घटनेत 9 बस प्रवाशांचा समावेश आहे. पाकिस्तान पोलिसांनी (Pakistan Police) दिलेल्या माहितीनुसार पहिल्या घटनेत हत्यारबंद हल्लेखोरांनी नोश्की जिल्ह्यातील एका राजमार्गावरून बस रोखली. नंतर बसमधील 9 लोकांचे अपहरण केले. पाकिस्तानच्या डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार आणखी एका वाहनावर हल्ला करण्यात आला त्यात एक जण ठार झाला तर चार जण जखमी झाले.

या नऊ लोकांचे मृतदेह जवळच्याच डोंगराळ भागात (Balochistan) आढळून आले आहेत. या मृतदेहांवर बंदुकीच्या गोळ्यांचे निशाण आढळले. ही बस बलुचिस्तानातील क्वेटा शहरातून ताफ्तानकडे निघाली होती. त्याचवेळी हल्लेखोरांनी बस रोखली. बसमधील प्रवाशांची ओळख पटवून त्यांचे अपहरण करत त्यांना डोंगराळ भागात घेऊन गेले. यानंतर या लोकांची हत्या करण्यात आली. या घटना वारंवार घडू लागल्याने जगभरात पाकिस्तान एक असुरक्षित देश म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

Pakistan : सरकारी कार्यक्रमात ‘रेड कार्पेट’ बंद; खर्च कमी करण्यासाठी पाकिस्तानचा निर्णय

दुसऱ्या घटने याच रस्त्यावरून जाणाऱ्या कारवर गोळीबार करण्यात आला. या घटनेत दोन प्रवाशांच्या मृ्त्यू झाला आणि दोन जण जखमी झाले आहेत. या घटनांमुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मीर सरफराज बुगती म्हणाले, की या घटनेत सहभागी असणाऱ्या दहशतवाद्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. या दहशतवाद्यांना शोधून त्यांना लवकरच तुरुंगात टाकू.

पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनीही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या हल्ल्याची जबाबदारी अजून कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. परंतु, मागील काही दिवसांपासून पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यांत वाढ झाली आहे. बलुचिस्तानमध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मी सक्रिय आहे. मागील काही दिवसांत या संघटनेने माच शहर, ग्वादर आणि तुरबतमध्ये तीन मोठे हल्ले केले. या हल्ल्यात 17 दहशतवादी मारले गेल्याचे सांगण्यात आले होते.

Pakistan News : पाकिस्तानातील ग्वादर बंदरावर मोठा हल्ला; आठ दहशतवाद्यांचा खात्मा

follow us