Pakistan News : आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला मोठं (Pakistan News) घबाड सापडलं आहे. पाकिस्तानच्या समुद्री क्षेत्रात कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा (गॅस) मोठा साठा सापडला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सुधारेल असा दावा केला (Pakistan Economy) जात आहे. तीन वर्षे सर्व्हे केल्यानंतर शोधण्यात आलेला हा साठा जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऑइल अँड गॅस फिल्ड मानला जात आहे. कच्च्या तेलाला (Crude Oil) काळे सोने देखील म्हटले जाते.
पाकिस्तानात सध्या आर्थिक संकट वाढत चालले आहे. कर्ज मोठ्या (Loan) प्रमाणात वाढले आहे. आता तर अशी वेळ आली आहे की आधीचे कर्ज फेडण्यासाठी नवे कर्ज घ्यावे लागत आहे. पाकिस्तानी राज्यकर्ते फक्त कर्ज मिळवण्याच्या उद्देशानेच दुसऱ्या देशांचे दौरे करत आहेत. चीनने मदत (China) केल्यानंतरही पाकिस्तानच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. आर्थिक संकट (Pakistan Economic Crisis) तर आहेच शिवाय राजकीय अस्थिरतेनेही नवे संकट उभे केले आहे. चारही बाजूंनी संकटे निर्माण झालेली असताना पाकिस्तानात दहशतवादाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे.
रशिया अन् चीनच्या मैत्रीचा जपानला धसका; जाणून घ्या, जपानच्या समुद्रात काय घडतंय?
पाकिस्तानच्या ऑइल अँड गॅस रेग्यूलेटरच्या माजी सदस्याने डॉन न्यूजला सांगितले की कच्चे तेल आणि गॅसचा (Natural Gas) साठा सापडल्याने अपेक्षा वाढणे चांगली गोष्ट आहे. परंतु, याठिकाणी आपल्या अपेक्षेइतकेच कच्चे तेल आणि गॅस मिळेल असे शक्यतो होत नाही. या नव्या साठ्यामुळे देशाची ऊर्जेची गरज पूर्ण होईल का असे विचारले असता त्यांनी सांगितले या प्रश्नाचं उत्तर तेल आणि गॅस रिजर्वचा आकार तसेच त्याच्या रिकवरी दरावर अवलंबून आहे. जर हा रिजर्व गॅस असेल तर आपण आता जो गॅस दुसऱ्या देशांकडून खरेदी करत आहोत त्यातून सुटका होईल. जर तेल रिजर्व असेल तर तेल आयात होणाऱ्या तेलाऐवजी या तेलाचा वापर करता येईल.
पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात तेल आणि गॅस आयात करावा लागतो. यासाठी अब्जावधी रुपये खर्च करावे लागतात. 2023 मध्ये पाकिस्तानने 17.5 अब्ज डॉलर्स रुपये ऊर्जा साधनांसाठी खर्च केले होते. पाकिस्तानी वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूननुसार आगामी सात वर्षांच्या काळात पाकिस्तानचे ऊर्जा आयात बिल दुपटीने 31 अब्ज डॉलर इतके होईल. पाकिस्तान देशाच्या एकूण गरजेच्या 29 टक्के गॅस, 85 टक्के कच्चे तेल, 20 टक्के कोळसा आणि 50 टक्के एलपीजी अन्य देशांकडून खरेदी करतो.
पाकिस्तानला तेल आणि वायूचा साठा सापडल्याने तेथील सरकार आणि नागरिक उत्साहीत झाले आहेत. मात्र त्यांचा हा उत्साह फार काळ टिकणार नाही. कारण साठा सापडला असला तरी यातून प्रत्यक्षात तेल आणि गॅस मिळणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे पाकिस्तानचे स्वप्न लवकर पूर्ण होण्याची कोणतीही शक्यता नाही. तेलाचा साठा मिळाला असला तरी प्रत्यक्षात तेल किंवा गॅस मिळण्याची प्रक्रिया अत्यंत जटील आहे. यात वेळही भरपूर लागणार असल्याचे पाकिस्तानच्या ऑइल अँड गॅस रेग्युलेटरच्या माजी सदस्यांनी स्पष्ट केले.
‘इस्त्रायल धोक्यात येईल’, ‘पुतिन तुम्हाला खाऊन टाकतील’; ट्रम्प अन् हॅरिस यांच्यात घमासान
तज्ज्ञांच्या मते, तेल आणि गॅसचा साठा शोधून काढण्यासाठी तब्बल 5 अब्ज डॉलर्स खर्च झाले आहेत. आता पुढील टप्प्यातही भरपूर पैसे खर्च करावे लागणार आहेत. समुद्रातून तेल किंवा गॅस काढण्यासाठी किमान चार ते पाच वर्षे लागतात. या गोष्टी पाहिल्या असता पाकिस्तानला तत्काळ कोणताच दिलासा मिळणार नाही. या साठ्यातून तेल आणि गॅस मिळवणे खूप कठीण आहे. या प्रक्रियेत पैसेही जास्त खर्च होत असल्याने फायदा पाहिजे तितका मिळत नाही.