Download App

PM Modi : ‘आधी पुरावे द्या, नक्कीच विचार करू’; पन्नू प्रकरणी PM मोदींचे अमेरिकेला उत्तर

PM Modi : खलिस्तानी फुटीरवादी गुरपतवंतसिंह पन्नूच्या हत्येच्या कटात भारतीय अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. अमेरिकी संस्थांच्या या दाव्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पीएम मोदी म्हणाले, अमेरिकेकडून जर पुरावे दिले तर त्या पुराव्यांची तपासणी करू परंतु, काही घटनांमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध खराब होणार नाहीत. फायनान्शियल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत पीएम मोदींनी प्रतिक्रिया दिली.

या प्रकरणावर मोदींनी सविस्तर बोलणं टाळलं. ते फक्त इतकच म्हणाले की आम्ही पुराव्यांवर नक्कीच विचार करू. जर कुणी आम्हाला काही सूचना माहिती देत असेल तर त्याची तपासणी आम्ही नक्कीच करू. जर आमचा नागरिक काही चुकीचं करत असेल तर आम्ही त्यावर विचार करण्यास तयार आहोत. कायद्याच्या राज्यासाठी आम्ही नेहमीच प्रतिबद्ध आहोत असे मोदी म्हणाले. भारत आणि अमेरिकेच्या संबंधात सुरक्षा आणि दहशतवादाला प्रतिबंध या मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. एखाद्या घटनेमुळे दोन्ही देशांतील संबंध खराब होतील असं म्हणणं चुकीचं आहे.

PM Modi : तुम्हाला वाटतयं मी इन्कम टॅक्सवाले पाठवेल; दिव्यांग विद्यार्थ्याला असं का म्हणाले मोदी?

हे तत्व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली धमक्या देतात आणि हिंसा भडकवतात. गुरपतवंतसिंह पन्नूला 2020 मध्येच भारताने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं. त्यानंतर तो कॅनडा आणि अमेरिकेत लपून राहत आहे. भारताने याआधी अनेक वेळा पाश्चिमात्य देशांना इशारा दिला आहे की पन्नूच्या कारवायांना गांभीर्याने घ्या. त्यानंतरही या देशांनी दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे.

Gurupatwant Singh Threat : माझ्या हत्येचा कट फसला पण आता.. पन्नूची संसदेवर हल्ल्याची धमकी

समिती करणार तपासणी 

अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनी निखील गुप्ता नामक एका व्यक्तीला अटक केली होती. भारतीय सुरक्षा एजन्सींच्या इशाऱ्यावर पन्नी याची हत्या करण्याचा कट रचण्यात आला आणि निखील गुप्ता हा या एजन्सींच्या इशाऱ्यावर काम करत होता, असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. मात्र, भारताने हे आरोप फेटाळून लावले होते. या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारताच्या सुरक्षा धोरणांच्या दृष्टीने ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे भारताने त्यावेळेसच स्पष्ट केले होते. तसेच या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चौकशी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. गुरपतवंतसिंह पन्नूकडे कॅनडा आणि अमेरिका या दोन देशांची नागरिकता आहे. येथूनच पन्नू व्हिडिओ तयार करून भारताला धमकावण्याचे काम करत आहे.

Tags

follow us