PM Modi यांनी घेतलं तिरूपती बालाजीचं दर्शन, पाहा फोटो

पंतप्रधान मोदी सध्या तेलंगणा दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतलं त्याचबरोबर विधिवत पूजा देखील केली.

पंतप्रधानांच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून हे फोटो पोस्ट करण्यात आले होते. या फोटोमध्ये मोदी यांनी पांढरीशॉल भगवा गमछा आणि माथ्यावर टिळा लावल्यास देखील दिसलं.

यावेळी मोदींनी देशातील नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. तसेच देशाच्या समृद्धीसाठी ही प्रार्थना केली असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटला आहे.

रविवारी सायंकाळी मोदी तिरूमलामध्ये पोहोचले होते. यावेळी आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस अब्दुल नजीर आणि मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी विमानतळावर जात त्यांचे स्वागत केले.
