Download App

ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून परराष्ट्र सचिवपदी…

Britan News : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक(Rishi Sunak) यांनी माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन(David Cameron ) यांची ब्रिटनच्या मंत्रिमंडळात मोठ्या पदावर नियुक्ती केली आहे. ब्रिटनच्या परराष्ट्र सचिवपदी डेव्हिड कॅमेरुन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऋषी सुनक यांच्याकडून मंत्रिमंडळात नवे फेरबदल करण्यात येत आहेत. नूकतीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असलेल्या ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. अशातच आता ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती केली.

डाउनिंग स्ट्रीटच्या मते, माजी पंतप्रधानांची अनपेक्षित नियुक्ती सुएला ब्रेव्हरमन यांना गृह सचिवपदावरून काढून टाकल्यानंतर त्यांच्या जागी जेम्स क्लेव्हरली यांची नियुक्ती करण्यात आली. यामुळे परराष्ट्र कार्यालयातील सर्वोच्च पद रिक्त झाले आहे. दरम्यान, ऋषी सुनक यांनी जेम्स चतुराईची ब्रिटीश सरकारमध्ये गृह खात्यासाठी राज्य सचिव म्हणून नियुक्ती केली.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पॅलेस्टाईन समर्थक मोर्चाच्या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल विधान केल्याने गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांची हकालपट्टी केली. वृत्तसंस्थेच्या माहितीनूसार ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांची हकालपट्टी केली. ब्रिटनमध्ये बाद झाल्याने सुनक यांच्यावर मोठा दबाव टाकण्यात आल्याचं बोललं जात आहे.

‘तत्कालीन पालकमंत्री पूर आला म्हणून पळून जात होते’; उदय सामंतांचा परबांवर आरोप

ब्रिटनमध्ये काढण्यात आलेल्या एका मोर्चादरम्यान, पोलिसांनी एकाच पक्षाच्या बाजूने कारवाई केल्याचं विधान सुएला ब्रेव्हरमन यांनी केल्याचं समोर आलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुएला यांनी हे विधान केल्यानंतर लंडनच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

आमदार टिंगरेंना लोकायुक्तांचा दणका; केलेल्या कामांचे कोट्यावधी रुपये खिशातून द्यावे लागणार?

सुएला यांनी लंडनमध्ये समाजात तणाव निर्माण होईल असं विधान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विरोधकांकडूनही जोरदार दबाव वाढत असल्याने सुनक सरकारकडून ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

Tags

follow us