Download App

मोठी बातमी! अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला, गोळी कानाला चाटून गेली

निवडणूक रॅलीदरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Written By: Last Updated:

Shooting at Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. ट्रम्प पेनसिल्व्हेनियामध्ये रॅली घेत असताना अचानक गोळीबार सुरू झाला. याचा व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये ट्रम्प या हल्ल्यातून थोडक्यात बचावल्याचं दिसतय. (Shooting) गोळी त्यांच्या कानाला लागून गेली. (Donald Trump) यामध्ये जर गोळी थोडी पुढे मागे झाली असती तर मोठी दुर्घटना येथे घटली असती अशी परिस्थिती पाहायला मिळाली. या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘त्यांच्या कानातून गोळी गेल्यासारखे वाटले. या हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या कानांवर रक्त दिसत आहे. गोळी झाडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प स्वत:चा बचाव करण्यासाठी खाली वाकले. मात्र, गोळी केवळ त्यांच्या कानाला लागली आणि ते थोडक्यात बचावले.

कानातून रक्त आलं ओवैसी जरांगे एकत्र येणार?, महायुतीसह माविआचं टेन्शन वाढणार, अनेक चर्चांना उधाण

या गोळीबारात ट्रम्प जखमी झाले आहेत. बंदुकीचा आवाज येताच ट्रम्प उजव्या हाताने आपला उजवा कान धरतात, नंतर ते पाहण्यासाठी हात खाली करतात आणि त्यानंतर ते व्यासपीठाच्या मागे गुडघे टेकून बसतात व अमेरिकन सीक्रेट सर्व्हिस एजंटच्या एका गट त्यांना कव्हर करतो. यावेळी ट्रम्प यांच्या कानातून रक्त येत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

मला मोठा आवाज ऐकू आला

आपल्या देशात असे घडू शकते यावर विश्वास बसत नाही. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही, जो आता मृत्यूमुखी पडला आहे. माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला गोळी लागली होती. ते मला लगेच कळले. काहीतरी गडबड होते असल्याची मला त्यावेशी शंका आली होती कारण मला मोठा आवाज ऐकू येत होता. असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांच्याशी चर्चा करेल

ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर अध्यक्ष जो बायडन म्हणाले की, ‘माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पेनसिल्व्हेनियातील त्यांच्या रॅलीत झालेल्या गोळीबारानंतर सुरक्षित आहेत त्यामुळे मी निश्चिंत आहे. गोळीबारानंतर सुमारे दोन तासांनंतर रेहोबोथ बीचवरून बोलताना बिडेन म्हणाले, अशा प्रकारच्या हिंसाचाराला अमेरिकेत जागा नाही. या प्रकरणावर मी ट्रम्प यांच्याशी लवकरच चर्चा करेल.

ओबामा यांच ट्विट मी कुठेही संधी शोधणार नाही, कुठेच जायची इच्छा नाही; रावसाहेब दानवे यांचे राजकीय निवृत्तीचे संकेत !

रॅलीत झालेल्या गोळीबाराबाबत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्विट केलं आहे. आपल्या लोकशाहीत राजकीय हिंसेला जागा नाही. नेमकं काय झालं हे अद्याप आम्हाला माहीत नसलं तरी, माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुरक्षित आहेत आणि त्यांना गंभीर दुखापत झाली नाही त्यामुळे चिंतेचं कारण नाही असं ओबामा आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

follow us

संबंधित बातम्या