ओवैसी – जरांगे एकत्र येणार?, महायुतीसह माविआचं टेन्शन वाढणार, अनेक चर्चांना उधाण

ओवैसी – जरांगे एकत्र येणार?, महायुतीसह माविआचं टेन्शन वाढणार, अनेक चर्चांना उधाण

Asaduddin Owaisi On Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिला नाहीतर आगामी विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे करायचे की पाडायचे याचा निणर्य 20 जुलै घेणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला दिला आहे.

तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) पहिल्यादा छत्रपती संभाजी नगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) दौऱ्यावर आलेले एमआयएमचे (MIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या चर्चेसाठी सकारात्मकता दाखवल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

आज असदुद्दीन ओवैसी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी संभाजी नगरमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना असदुद्दीन ओवैसी यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चेसाठी सकारात्मकता दाखवली आहे.

माध्यमांशी बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले, जर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून प्रस्ताव आला तर पत्रकारांना सोबत घेऊन जाऊन आम्ही चर्चा करेल. बीडमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) जरांगे यांच्यामुळे पडल्या. त्यांना विजय मिळत आहे मग मुस्लिम का? जिंकत नाही असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केले. तसेच जर त्यांच्याकडून बोलणं होत असेल तर आम्ही नक्की त्यांच्यासोबत चर्चा करणार. असं माध्यमांशी बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

असदुद्दीन ओवैसी पुढे म्हणाले की, मी जरांगे पाटील यांचा आदर करतो आणि त्यांचा अभिनंदन देखील करतो. त्यांच्यामुळे राज्यात 8 खासदार निवडून आले. पण राज्यात एकही मुस्लिम उमेदवार निवडून आला नाही. निवडणुकीत सर्व समाजचे उमेदवार जिंकत आहे मात्र मुस्लिम उमेदवार जिंकत नाही. औरंगाबादमधून इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) निवडून आले नसल्याने आज महाराष्ट्रतील मुस्लिममध्ये राग आहे. आमचा एकमेव उमेदवार जिंकून आला नसल्याचा दुःख मुस्लिम समाजात आहे. मुस्लिम समाजाने आजपर्यंत सर्वांना मतदान केलं आहे मग आम्हाला का मतदान करत नाही याचा समाजाने विचार केला पाहिजे. असंही माध्यमांशी बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

मी दिमागाने खेळतो, फडणवीस, शिंदे, अजितदादांना डावात हरवलं, शांतता रॅलीत पाटलांचा हल्लाबोल 

जर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ओवैसी आणि मनोज जरांगे एकत्र आले तर राज्यातील संपूर्ण राजकीय समीकरण बदलू शकतात आणि याचा मोठा फटका सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीला बसू शकतो. अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube