Taiwan China War : सध्या रशिया युक्रेन यांचंही युद्ध काही थांबायला नाव घेत नाही त्यातच आता दुसरी बातमी समोर आली आहे. तैवान चीनच्या विरोधात युद्धाची तर तयारी करत असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. (China) विशेष म्हणजे तैवानच्या एका निर्णयानंतर चीननेही आपली लष्करी जमवाजमव चालू केली आहे. त्यामुळे आता या दोघांमध्ये युद्ध छेडलं जातं की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.
तैवानने चीनच्या विरोधात आतापर्यंतचा सर्वात मोठा युद्धाभ्यास चालू केला आहे. या युद्धाभ्यासात तब्बल 22 हजार राखीव सैनिकांचा समावेश करण्यात आला आहे. एवढंच नाही. तर या युद्धाभ्यासात विध्वंसक क्षेपणास्त्रांचाही समावेश करण्यात आला असून, त्याचं परीक्षण केलं जात आहे. तैवानची ही तयारी समजताच चीननेही कंबर कसली असून प्रशांत महासागरातील बेटांवर आपली गस्त वाढवली आहे.
रशियाने भारताला दणका दिलाच! पाकिस्तान अन् रशिया मोठी डील, करारावर सह्या; नेमकं काय घडलं?
तैवानकडून केल्या जात असलेल्या युद्धाभ्यासात अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. यात सायबर अटॅक, क्षेपणास्त्र हल्ला, जमिनीवरची लढाई यांचा सराव केला जात आहे. या युद्धाभ्यासात हजारो सैनिक सामील झाले आहेत. आर्टिलरी, टँक्स, मिसाईल्स यांना घेऊन सराव केला जात आहे. विशेष म्हणजे देशातील सामान्य जनतेलाही या ड्रिलमध्ये सहभागी करून घेण्यात आलं आहे. तैवानची ही सगळी हालचाल लक्षात घेता चीननेही सतर्कतेची भूमिका घेतली आहे. चीकडून फायटर जेटच्या निर्मितीची गती वाढवण्यात आली आहे.
या सर्व घडामोडी पाहता हे युद्धाचे संकेत तर नाहीत ना? असा सवाल अनेकांना पडला आहे. चीनने लढाऊ विमानांचे उत्पादन वाढवले आहे. चीनतर्फे J-35 या लढाऊ विमानांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे. चीनचा हा पवित्रा लक्षात घेता लवकरच हा देश तैवानवर हल्ला करून तो प्रदेश काबीज करण्याच्या तयारीत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. J-35 हे लढाऊ विमान विशेषत: सर्जिकल स्ट्राईकदरम्यान वापरले जाते.
अमेरिका हा महासत्ता असलेला देश याआधीपासूनच तैवानची वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत आलेला आहे. नुकतेच अमेरिकेने जपान आणि ऑस्ट्रेलिया यांना तुमची चीन आणि तैवान संघर्षावर भूमिका काय आहे? असे विचारलेले आहे. त्यामुळे आता खरंच चीन आणि तैवान यांच्यात युद्ध चालू होणार का? ते चालू झाले तर यात अमेरिकेची भूमिका काय असणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.