Download App

Russia : वृद्ध महिलेचा सवाल अन् पुतिन निरुत्तर, थेट माफीच मागितली; रशियात काय घडलं ?

Russian President Vladimir Putin Apologize : दीड वर्ष उलटून गेलं तरीही रशिया आणि युक्रेनमधील यु्द्ध (Russia Ukraine War) थांबलेलं नाही. शहरं उद्धवस्त झाली. लाखो लोकांचा बळी गेला. देशाच्या विकासाची चाकं थांबली, महागाईचा आगडोंब उसळला, असं विदारक चित्र या यु्द्धानं रंगवलं. आता दीड वर्षांनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी माफी मागितली आहे. पण, युद्धासाठी नाही तर देशात वाढलेल्या महागाईसाठी. रशियात सध्या महागाई (Russia Inflation) प्रचंड वाढली आहे. अंड्यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. या परिस्थितीला सरकार जबाबदार आहे असे म्हणत पुतिन यांनी देशातील जनतेची माफी मागितली आहे. एका टीव्ही मुलाखतीदरम्यान विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना पुतिन यांनी माफी मागितली. पुतिन म्हणाले, मी सरकारच्या अपयशाबद्दल सगळ्यांची माफी मागतो. (Russian President Vladimir Putin Apologized Russian people due to increase inflation)

खरंतर मागील एक वर्षाच्या काळात रशियात महागाईत मोठी वाढ झाली आहे. अंड्यांच्या किंमतीत 40 टक्के वाढ झाली आहे. पुतिन वर्षाच्या शेवटी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असतात. या संवादादरम्यान त्यांनी देशातील नागरिकांची माफी मागितली. एका वृद्ध महिलेने त्यांना अंडी आणि चिकनच्या वाढत्या किंमतींसंदर्भात प्रश्न विचारला होता.

३ लाख जणांचा मृत्यू, हजारो लोकांचा पत्ताच नाही; Russia Ukraine युद्धाच्या एका वर्षानंतर काय आहे परिस्थिती?

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून पश्चिमी देशांनी रशियावर कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्याचा फटका रशियाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. महागाई वाढली आहे. रशियातील एक एजन्सी रोसटॅटनुसार, मागील दोन महिन्यांच्या काळात अंड्यांच्या किंमतीत 30 टक्के वाढ झाली आहे. एक डझन अंड्यांसाठी 1.8 डॉलर द्यावे लागत आहेत.

रोबोबँकनुसार, सन 2022 मध्ये रशिया 1.2 अब्ज अंडी निर्यात करत होता. पण, युद्ध सुरू झाल्यानंतर मात्र रशियाच्या अडचणी वाढल्या आणि अंडी निर्यात करणे कठीण झाले आहे. रशियाचे निर्यातदार अनेक देशात अंडी निर्यात करू शकत नाहीत. तर दुसरीकडे या निर्बंधांमुळे उच्च दर्जाच्या अंड्यांसाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञानही त्यांना मिळेनासे झाले आहे.

रशियातील महागाई दर आता 7.4 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. महागाई आणखी वाढू शकते असा इशाराही पुतिन यांनी दिला. या वाढत्या महागाईचा प्रतिकूल परिणाम अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे. देशात वाढत चाललेली महागाई कमी करण्यासाठी रशियाच्या सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र अद्याप यश मिळालेले नाही. आगामी काळात महागाईत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Russia Ukraine War : रशियाकडून पुन्हा मिसाईल आणि ड्रोनने हल्ला, 11 जणांचा मृत्यू

follow us