Ukraine War : युक्रेन सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत (Ukraine War) आहे. आता तर अशी माहिती समोर आली आहे की आपल्या सैनिकांचा सप्टेंबर महिन्याचा पगार देण्यासाठी सुद्धा सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळे दुसऱ्या देशांकडे मदत मागितली जात आहे. युक्रेनला जवळपास 60 अब्ज डॉलर्सची गरज आहे. या पैशांतून सैनिकांचा पगार देता येऊ शकेल. सैनिकांसाठी आरोग्य सुविधा, औषधोपचार आणि अन्य खर्चासाठी देशाला पैशांची जास्त गरज आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू (Russia Ukraine War) होऊन दोन वर्षे उलटून गेली आहेत. या विनाशकारी युद्धात दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातही युक्रनला जास्त फटका बसला आहे. शहरे उद्ध्वस्त झाली आहे. शाळा, हॉस्पिटल्स, रस्ते अशा मूलभूत सुविधा जमीनदोस्त झाल्या आहेत. या सर्व गोष्टींचे पुनर्निर्माण करण्यासाठी युक्रेनला मोठ्या प्रमाणात निधीची गरज भासणार आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत युक्रेन मोठ्या आर्थिक संकटात अडकला आहे.
युद्ध सातत्याने सुरू असल्याने देशाच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. आता तर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की जर युक्रेनला तातडीने आर्थिक मदत मिळाली नाही तर सैनिकांचे सप्टेंबर महिन्यातील पगार करता येणार नाहीत. युद्धामुळे सरकारला सर्वाधिक पैसे संरक्षणवर खर्च करावे लागत आहेत. युक्रेनचे डिफेन्स बजेट जवळपास 50 अब्ज डॉलर्सचे आहे. परंतु हे वर्ष संपण्याआधी तिजोरीत पैसेच राहिलेले नाहीत.
युक्रेनला सध्या तातडीने 60 अब्ज डॉलर्सची गरज आहे. डिफेन्स क्षेत्रमुळे आर्थिक संकट वाढले आहे. रक्षा मंत्री रुस्तम उमिरोव यांनी याबाबत राष्ट्राध्यक्षांकडे नाराजीही व्यक्त केली. युक्रेनच्या डिफेन्स कमिटीच्या चेअरवूमन यांनी सांगितले की आम्हाला डिफेन्स मंत्रालयाकडून पैसे शिल्लक राहिले नसल्याचे संगण्यात आले होते. याआधी ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान डेनिस श्म्यहल यांनी सांगितले होते की सध्या देशाला सध्या डिफेन्स क्षेत्राला मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. या संकटातून बाहेर येण्यासाठी तातडीने 12 अब्ज डॉलर्सची गरज आहे असेही त्यांनी सांगितले होते.
युक्रेनमध्ये आर्थिक संकट निर्माण झालेले असताना राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी पुन्हा एकदा अमेरिकेकडे (USA) मदतीची याचना केली आहे. शु्क्रवारी जर्मनीत युक्रेन डिफन्स काँट्रॅक्ट ग्रुपची एक बैठक झाली. या बैठकीत अमेरिका, युक्रेनसह अन्य देश सहभागी झाले होते. या बैठकीत झेलेन्स्की आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांची भेट झाली. यावेळी झेलेन्स्कींनी अमेरिकेकडे मदत मागितली. अमेरिका युक्रेनला सुरक्षा मदत म्हणून 250 मिलियन डॉलर देण्यास तयार आहे.
Ukraine War : युक्रेन युद्धात तेल! रशियाच्या कट्टर शत्रूच्या हाती ‘नाटो’ची कमान