मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असल्यामुळं…, मंत्री गणेश नाईक जातीवर काय बोलले?

जात या मुद्द्याला हात घातलाना गणेश नाईकांनी हे वक्तव्य केलं. गणेश नाईक म्हणाले की, कधीकधी जात ही माणसाला शाप ठरते तर कधी ती वरदान ठरते.

News Photo   2026 05 16T153810.728

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राम्हण असल्यामुळं..., मंत्री गणेश नाईक जातीवर काय बोलले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण (CM) आहेत म्हणून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला असं खळबळजनक वक्तव् मंत्री गणेश नाईक यांनी केलं आहे. रायगड जिल्ह्यातील पेण येथे आयोजित राष्ट्रीय आगरी अध्यात्मिक संमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

नाईकांनी म्हटल्या प्रमाणे शिंदेंचा टांगा पलटी केलाच;नवी मुंबईत पुन्हा एकदा गणेश नाईकांचे वर्चस्व

जात या मुद्द्याला हात घातलाना गणेश नाईकांनी हे वक्तव्य केलं. गणेश नाईक म्हणाले की, कधीकधी जात ही माणसाला शाप ठरते तर कधी ती वरदान ठरते. देवेंद्र फडणवीस हे चुतुरस्त नेतृत्व आहे. त्यांनी सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. तरी देखील ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला असंही ते म्हणाले.

नाईकांचा रोख कुणाकडं?

राष्ट्रीय आगरी अध्यात्मिक संमेलनात बोलताना, गणेश नाईकांनी हे वक्तव्य केलं. असं असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नेमकं कुणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला हे मात्र त्यांनी स्पष्ट केलं नाही. गणेश नाईकांचा रोख हा एखाद्या राजकीय नेत्याकडं, पक्षाकडं आहे की एखाद्या जातसमूहाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याकडं आहे हे मात्र स्पष्ट झालं नाही.

आजच्‍या राजकारणात अर्थकारणाशिवाय काही चालत नाही. तुम्‍ही स्‍वच्छ विचारसरणीचे असाल तर लोक तुम्‍हाला निवडून देतील याची गॅरंटी नाही असं वक्तव्य गणेश नाईक यांनी केलं. तुमचं मन स्वच्छ असेल, तर मानसिक स्थिरता राहील, मग शारिरीक स्थिरता मिळते. त्‍यातून समाजकार्य होतं, मग अर्थकारण होतं आणि आजच्‍या राजकारणात अर्थकारणाशिवाय काहीच चालत नाही असं गणेश नाईक यावेळी म्‍हणाले आहेत.

Exit mobile version