Download App

Google देणार 50 कोटी लोकांना धक्का, आजपासून बंद करणार ‘ही’ सर्व्हिस

  • Written By: Last Updated:
Google Podcast Service Stop From Today : आज संपूर्ण जगात Google आपल्या कोट्यावधी ग्राहकांना विविध सुविधा देत आहे. मात्र आता Google तब्बल 50 कोटींहून जास्त लोकांना मोठा धक्का देणार आहे. आजपासून Google आपली एक खास सर्व्हिस बंद करणार आहे. होय, आजपासून Google आपली Google Podcast सर्व्हिस बंद करणार आहे. आतापर्यंत प्ले स्टोअरवर Google Podcast ला 50 कोटीपेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केला आहे. मात्र आता या वापरकर्त्यांना आजपासून म्हणेजच 2 एप्रिलपासून या सर्व्हिसचा वापर करता येणार नाही.
महायुतीत राजकीय भूकंप, हेमंत गोडसे घेणार मोठा निर्णय? आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
माहितीनुसार, सध्या Google ऑडिओ आणि व्हिडिओ पॉडकास्टमध्ये मोठी गुंतणवूक करण्याचा विचार करत आहे. 2023 मध्ये झाली होती घोषणा गेल्या वर्षी यूट्यूब म्युझिकने एका ब्लॉग पोस्टमध्ये ही सर्व्हिस बंद करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस हे ॲप जगातील बहुतेक देशात  वापरकर्त्यांसाठी बंद करण्यात येणार आहे. सध्या Google ने हे ॲप अमेरिकेत बंद केले आहे. Google सध्या  Google Podcasts वापरणाऱ्या वापरकर्त्यांना  एका नोटिफिकेशन्सद्वारे त्यांचा डेटा यूट्यूब म्युझिक किंवा कोणत्याही पॉडकास्ट सर्व्हिसवर हस्तांतरित करण्यास सांगत आहे.
VVPAT स्लिपची होणार संपूर्ण मोजणी? सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस..
Google Podcast बंद का होत आहे ?
2023 मध्ये कंपनीने आपल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये माहिती दिली होती कि, 2024 मध्ये कंपनी यूट्यूब म्युझिक पॉडकास्टमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. यामुळे आता कंपनी Google Podcast बंद करण्याची तयारी करत आहे.
Google Podcast प्ले स्टोअरवर उपलब्ध
Play Store आणि Apple Store अजूनही Google Podcasts ॲप डाउनलोडसाठी उपलब्ध आहे. मात्र आजपासून वापरकर्त्यांना त्यांचे आवडते शो स्ट्रीम करता येणार नाही. यामुळे तुम्हाला हे ॲप तुमचे आवडते शो दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये माइग्रेट करण्यासाठी जुलै 2024 पर्यंत वेळ देत आहे.
सर्व्हिस कशा हस्तांतरित करायच्या
सर्वात आधी तुम्हाला Android किंवा iOS डिव्हाइसवर Google Podcasts ॲप ओपन करावे लागेल.
यानंतर होम टॅबवर क्लिक करा.
यानंतर Google Podcasts ॲप शटडाउन नोटिफिकेशन्स शोधा.
यानंतर Export Subscription वर क्लिक करा.
Export Subscriptions मध्ये Export to YouTube Music वर क्लिक करा.
तुम्हाला आता YouTube Music ॲपवर रीडायरेक्टकरण्यात येईल आणि Gmail अकॉऊंट निवडण्यास सांगितले जाईल.
चीनची खोडी! अरुणाचल प्रदेशातील 30 ठिकाणांचे केले नामकरण
यानंतर तुमचे सबस्क्रिप्शन YouTube Music ॲपमध्ये जोडले जाईल.
follow us

संबंधित बातम्या