नसरापूरमधील क्रूर अत्याचाराची घटना (Mumbai) ताजी असतानाच आता मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या कल्याणमध्ये अशीच संताप निर्माण करणारी घटना घडली आहे. कल्याण रेल्वे स्थानकात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या मुलीला कल्याणहून खोपोली येथे आपल्या मामाच्या घरी जायचं होतं. त्यासाठी ही मुलगी कल्याण रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनची वाट पाहत उभी होती. त्यावेळी आरोपीने तिचा मोबाईल फोन हिसकावून घेत तिला आपल्यासोबत येण्यास भाग पाडलं आणि तिच्यावर अत्याचार केला. काही दिवसांपुर्वीच पुण्याच्या नसरापूर येथे अशीच क्रूर घटना घडली होती. त्यानंतर मोठा संताप लोकांमध्ये निर्माण झाला. परंतु, काही दिवसांतच पुन्हा अशा घटना घडत असल्याने नागरीक आता जास्तच सत्पत झाले आहेत.
मुलीच्या भोळसरपणाचा घेतला फायदा, चुलत भावाचा अत्याचार; बापाला अटक
कायद्याचं राज्य, पोलिसांचा वचक, कुणाचीच खैर नाही, कठोर शिक्षा केली जाणार, त्याला सोडणार नाही, या आणि अशा अनेक गोष्टी नक्की कधी आणि कुणासोबत घडतात? कि फक्त घोषणा म्हणून वारंवार म्हणायच्या असतात? त्याचा कुठंच अवलंब करायचा नसतो? नक्की काय आहे या दोन्हीपैकी? या घोषणा प्रत्यक्षात येतात तर वारंवार या अत्याचाराच्या, अत्याचार करून खून करण्याच्या घटना कशा घडताता? आणि या घोषणा प्रत्यक्षात येत नसतील तर कशाला लागतेत पोलीस, कशाला हव कायद्याचं राज्य, कशाला हवा पोलिसांचा वचक, आणि कशाला हव राज्याला गृहखात? अशा असंख्य प्रश्नांनी ही घटना घडल्यावर डोक्यात गर्दी केली आहे.
या घटनेत मिळालेल्या माहितीनुसार, 14 वर्षाची पीडित मुलगी अहिल्यानगरहून आपल्या मामाला भेटण्यासाठी आली होती. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात चला मामाच्या गावाला तसं आपल्या मामाकंडं चालली होती. आहिल्यानगरवरुन आल्यानंतर कल्याणमध्ये उतरली होती. कल्याणहून तिला मामाच्या घरी खोपोलीला जायचं होतं. खोपोलीला जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात ती ट्रेनच्या प्रतीक्षेत होती. त्याचवेळी तिच्यावर अत्याचार करणारा आरोपी सौरभ सोनवणे तिला रेल्वे प्लॅटफॉर्मवर भेटला. पीडित अल्पवयीन मुलीसोबत काहीही ओळख नसताना सौरभने पीडित मुलीचा मोबाईल हिसकावून घेतला.
त्यानंतर ही मुलगी ‘माझा मोबाईल परत कर’ असं म्हणत मोबाईल देण्याची मागणी करत होती. मात्र, मुलीने जेव्हा मोबाईल परत मागितला तेव्हा सौरभने तिला मोबाईल परत पाहिजे तर माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल, असं सांगितलं. आरोपी सौरभ पीडित मुलीला पोलीस स्टेशनला घेऊन न जाता कल्याण रेल्वे यार्डात घेऊन गेला. या ठिकाणी निर्जनस्थळी सौरभने मुलीवर लैंगिक अत्याचार केला.
सीसीटीव्हीच्या मदतीने शोधला आरोपी
मुलीने कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेत कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली. सीसीटीव्हीच्या सहायाने कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच आणि जीआरपी पोलिसांनी सौरभला शोधून काढलं. या प्रकरणामध्ये पोलीस पुढील तपास करत आहेत. पण त्या मुलीसोबत जे घडलं त्याचं काय? त्या मुलीच्या हातातून मोबाईल हिसकावून घेत, त्या मुलीने मोबाईल देण्याची मागणी करत असताना आणि तीला बळजबरीने रेल्वे यार्डात घेऊन जाईपर्यंत तीथले पोलीस काय करत होते? तीथ कुणीच नागरिक नव्हते का? का कुणी त्या मुलीला त्या मुलापासून वाचवंल नाही? रेल्वे स्थानक इतकं शांत कसं? पोलीस कोणत्या कामावर होते? असे असंख्य प्रश्न आता आ वासून उभा आहेत. आणि याची उत्तर कोण देणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे….
