Download App

Porsche Car Accident : अखेर पोलीस आयुक्तांना जाग, येरवड्याचे दोन अधिकारी निलंबित

Porsche car Accident : पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील पोर्शे कार अपघात प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार येरवडा पोलीस

Porsche car Accident : पुण्यातील कल्याणीनगर (Kalyaninagar) परिसरातील पोर्शे कार अपघात (Porsche car Accident) प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार येरवडा पोलीस ठाण्यातील (Yerwada Police) दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे (Rahul Jagdale) आणि विश्वनाथ तोडकरी (Vishwanath Todkari) अशी दोघांची नावे आहे. तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही असा ठपका ठेवत दोघांचे निलंबन करण्यात आले आहे.

19 मे च्या पहाटे भरधाव पोर्शे कार चालवून बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोन जणांचा जीव घेतला होता. या प्रकरणात चौकशीसाठी पुणे पोलिसांनी एक इन्टर्नल कमिटी बनवली होती. या कमिटीच्या निर्णयानंतर येरवडा पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर घटनस्थळी भेट देऊनही  कंट्रोल रूमशी संपर्क केला नसल्याने क्राईम पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

पोर्शे कार अपघातावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, श्रीमंताच्या बापाचा पोरगा असला तरी…

19 मे च्या पहाटे भरधाव पोर्शे कार चालवून बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोन जणांचा जीव घेतला होता. या प्रकरणात त्याला सुरुवातील अवघ्या एका दिवसात जामीन मिळाला होता मात्र त्यानंतर त्याचा जामीन रद्द करून त्याला 14 दिवसांसाठी बाल निरीक्षणगृहात पाठवण्यात आले आहे. तर दुसरीकडे बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

राज्य सरकारची ‘ती’ मागणी योग्यच! शरद पवारांनी दिला सरकारला पाठिंबा

follow us

वेब स्टोरीज