“अंगावर धावून आला, धमकी दिली”;शिवराज मोरेंनी वाचवलेल्या मुलीने सत्य सांगितले

Shivraj More Helped Girl in MPSC Protest: MPSC आंदोलनातील व्हिडिओवरून नवनाथ बन यांनी केलेल्या आरोपांवर शिवराज मोरेंचा पलटवार केला.

Shivraj More Helped Girl in MPSC Protest

Shivraj More Helped Girl in MPSC Protest

Shivraj More Helped Girl in MPSC Protest: पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता एका व्हायरल व्हिडिओमुळे वेगळं वळण मिळालं आहे. भाजप प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी आंदोलनातील काही युवक आणि काँग्रेसच्या युवक नेत्यांवर नाईट लाईफ एन्जॉय करत असल्याचा आरोप केला होता. या आरोपांसाठी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओही शेअर केला. मात्र, या व्हिडिओमध्ये दिसणारी तरुणी आता समोर आली असून नवनाथ बन यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.

ज्ञानेश कुमार राजीनामा द्या, दिल्लीत पुन्हा विरोधकांचे आंदोलन; राहुल – प्रियंका पोलिसांच्या ताब्यात

“रोहित पवार, हीच तुमची नाईट लाईफ आहे का?”

नवनाथ बन यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आंदोलनातील एक युवक रस्त्यावर एका तरुणीसोबतच्या व्यक्तीशी वाद घालताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला होता. यावरून बन यांनी युवा काँग्रेसचे पदाधिकारी शिवराज मोरे (Shivraj More) यांच्यावरही निशाणा साधला. “रोहित पवार, हीच तुमची नाईट लाईफ आहे का?” असा सवाल करत त्यांनी आंदोलनादरम्यान धांगडधिंग्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप केला.

या आरोपानंतर शिवराज मोरे यांनी बन यांच्यावर पलटवार केला होता. त्यानंतर संबंधित तरुणी आणि मोरे यांनी पत्रकार परिषद घेत व्हिडिओमागची घटना वेगळी असल्याचा दावा केला.

तरुणीने सांगितलं की, एका युवकाकडून तिला त्रास दिला जात होता आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला जात होता. याच परिस्थितीत तिने शिवराज मोरे यांच्याशी संपर्क साधला. मोरे आणि त्यांच्या मित्रांनी आपल्याला मदत केल्याचं तिने सांगितलं.

राज्यात पाऊस नाही अन् इम्तियाज जलील यांच्यावर नोटांचा पाऊस; कव्वालीतील व्हिडिओ व्हायरल

शिवराज दादा माझ्यासाठी भावासारखे

“नवनाथ बन यांना या घटनेबद्दल पूर्ण माहिती नाही. माझ्यासोबत घडलेल्या प्रसंगाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. त्यांच्या आरोपांमुळे माझ्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. शिवराज दादा माझ्यासाठी भावासारखे आहेत. एका मुलाकडून मला त्रास होत होता, अंगावर धावून आला होता, धमकी देत तो मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी शिवराज दादा आणि त्यांच्या मित्रांनी मला मदत केली,” असं संबंधित तरुणीने सांगितलं.

व्हिडिओतील तरुणी आपल्या मित्राची बहीण

शिवराज मोरे यांनीही या घटनेची सविस्तर बाजू मांडली. व्हिडिओतील तरुणी आपल्या मित्राची बहीण असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांचा मित्र हैदराबादला असून त्याने फोन करून बहिणीला एका युवकाकडून त्रास होत असल्याची माहिती दिली होती, असा दावा मोरे यांनी केला.

पुणे पोलीस दलात खळबळ; पोलीस उपनिरीक्षकाची राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

त्या वेळी आपण नाशिकमध्ये असल्याचं सांगत मोरे म्हणाले की, तरुणी आणि तिची आई आपल्याला भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर आपण त्यांना वकिलाची मदत मिळवून दिली आणि पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तरुणीचा सुमारे तीन तास जबाब नोंदवून लेखी तक्रार घेतली. संबंधित युवकाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याचंही मोरे यांनी सांगितलं.

त्याने तिला रस्त्यावर तिला अडवलं

मात्र, त्यानंतरही संबंधित युवकाने तरुणीचा पाठलाग केल्याचा दावा मोरे यांनी केला. तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत जेवायला गेली असताना तो युवक तिथेही पोहोचला आणि त्याने रस्त्यावर तिला अडवलं. त्यावेळी ती प्रचंड घाबरून रडत होती, असं मोरे यांनी सांगितलं. याच घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा त्यांचा दावा आहे.

या प्रकरणात आपल्याकडे पुरावे असल्याचंही मोरे यांनी सांगितलं. पोलिसांनी आपला CDR काढल्याचा उल्लेख करत, आपल्याविरोधात कोणताही गुन्हा नसताना CDR का काढण्यात आला, असा सवाल त्यांनी केला. संबंधित युवकाकडून तरुणीला त्रास दिल्याचे कागदपत्रे आणि इतर पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला.

या घटनेला नाईट लाईफ कसं म्हणता?

“मुलीला मदत करण्यासाठी आम्ही गेलो होतो. मग या घटनेला नाईट लाईफ कसं म्हणता?” असा सवाल मोरे यांनी केला. संबंधित युवक अमली पदार्थांचं सेवन करत असल्याचा आरोप करत त्याच्याशी संबंधित फोटोही आपल्याकडे असल्याचं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, आपल्यावर नशा केल्याचा आरोप करण्यात आल्याचं सांगत मोरे यांनी तोही दावा फेटाळला. आंदोलनाच्या दिवशी सकाळच्या कार्यक्रमातील आपले फोटो उपलब्ध आहेत. आपण ड्रग्स घेतले असते तर आंदोलनात सहभागी झालो असतो का, असा सवाल त्यांनी केला.

मराठवाड्यात दुष्काळाचा दुहेरी फटका; वाचा, कुठं किती दिवसांचा चारा अन् कुठं किती दिवसांचा पाणीसाठा?

MPSC आंदोलन बदनाम करण्यासाठी आणि ते मोडीत काढण्यासाठी जाणीवपूर्वक अशा प्रकारचे आरोप केले जात असल्याचा दावा मोरे यांनी केला. आंदोलनस्थळी भाजपचे कार्यकर्ते लक्ष ठेवून असल्याचाही आरोप त्यांनी केला.

“नवनाथ बन, आमचा नाद करू नकोस”

नवनाथ बन यांना उद्देशून मोरे यांनी आक्रमक शब्दांत पलटवार केला. “नवनाथ बन, आमचा नाद करू नकोस,” असं म्हणत आपण धमकी देत नसून गांधीवादी मार्गाने आंदोलन करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात आणि पुण्यात ड्रग्स येतं कुठून, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राहुल गांधी हे आपले नेते असल्याने त्यांच्यासह आपल्याला लक्ष्य केलं जात असल्याचा दावाही मोरे यांनी केला.

दरम्यान, नवनाथ बन यांनी केलेल्या आरोपांनंतर संबंधित तरुणीने दिलेलं स्पष्टीकरण आणि शिवराज मोरे यांनी मांडलेली बाजू यामुळे या व्हायरल व्हिडिओवरून सुरू झालेला वाद आणखी चर्चेत आला आहे.

Exit mobile version