दिल्लीमधून मोठी बातमी समोर आली आहे. (NEET) नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात विद्यार्थ्यांनी मोठ आंदोलन उभारलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. यामध्येच आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTS)चे तब्बल 47 अधिकाऱ्यांना तडकाफडकी बडतर्फ करण्यात आलं आहे.
वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची असलेल्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द करण्यात आली, नीट परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा नीट परीक्षा घेण्यात आली. मात्र यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जतंर मंतरवर सीजेपी अर्थात कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे.
इन्स्टाग्रामवर अधिक सक्रिय व्हा; सरकारी योजनांचा प्रचार वाढवा; पंतप्रधान मोदींचा मंत्र्यांना सल्ला
नीट परीक्षा पेपर लीकच्या पार्श्वभूमीवर आता शिक्षण मंत्रालयाकडून (NTA) राष्ट्रीय टेस्टिंग एजेन्सीमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे, याची सुरुवात झाली असून, समोर आलेल्या माहितीनुसार तब्बल 47 अधिकाऱ्यांना तडकाफडकी बडतर्फ करण्यात आलं आहे, अजूनही काही महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. हे सीजेपीच्या आंदोलनाला मिळालेलं मोठं यश मानलं जात आहे.
दरम्यान सोनम वांगचुक यांनी उपोषण सेडलं आहे. पण दुसरीकडे सीजेपी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सोडून आम्हाला इतर काहीही मंजूर नसल्याचं सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत शिक्षण मंत्री राजीनामा देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहिल अशी भूमिका दिपके यांनी जाहीर केली आहे.
