पिंक बॉल टेस्टमध्ये कांगारूनी 10 विकेटने सामना जिंकला; टीम इंडियाला WTC Points Table मध्ये मोठा धक्का!

पिंक बॉल टेस्टमध्ये कांगारूनी 10 विकेटने सामना जिंकला; टीम इंडियाला WTC Points Table मध्ये मोठा धक्का!

 Team India Defeat Australia Win 2nd Test Match in Adelaide : टीम इंडियाला (India VS Aus) ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागलं. ॲडलेडमध्ये झालेल्या या डे-नाईट टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं भारताचा 10 गडी राखून पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव (Cricket News) केला. तिसरा कसोटी सामना 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला जाणार आहे.

ॲडलेड कसोटीच्या पहिल्या दिवशी ढगाळ वातावरण होते. वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीवर खूप मदत मिळत होती. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या एका निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का (Pink Ball Test) बसला. ॲडलेड कसोटीत नाणेफेक झाली, तेव्हा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याचा परिणाम असा झाला की, ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी ढगाळ वातावरणाचा पुरेपूर फायदा घेतला, गुलाबी चेंडूने भारतीय फलंदाजीची फळी उद्ध्वस्त केली.

या वयात ‘असा’ खोटारडेपणा करायचा? चंद्रशेखर बावनकुळेंचा शरद पवारांवर वार

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया पहिल्या डावात 180 धावांवर (Australia Win 2nd Test Match) गडगडली. यशस्वी जैस्वाल (0), केएल राहुल (37), शुभमन गिल (31), विराट कोहली (7), ऋषभ पंत (21), रोहित शर्मा (3) हे फलंदाज कांगारूंच्या गोलंदाजांसमोर झुकताना दिसले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 6 विकेट घेतल्या. त्याचवेळी स्कॉट बोलँड आणि पॅट कमिन्सने 2-2 विकेट घेतल्या. टीम इंडिया दुसऱ्या डावातही खराब स्थितीत होती. 175 धावांवर सर्वबाद झाली होती. विराट कोहली, ऋषभ पंत, रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्यांनी टीम इंडियाला खराब करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

शिवसेनेच्या 3 नेत्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवणार?, दिल्लीतून हिरवा कंदील आल्यावर होणार शिक्कामोर्तब

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज ट्रॅव्हिस हेडने टीम इंडियाच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. पहिल्या डावात 141 चेंडूत 140 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडची ही खेळी या सामन्यातील सर्वात मोठे टर्निंग पॉइंट ठरली. ट्रॅव्हिस हेडने भारतीय गोलंदाजांच्या साथीने खेळताना 17 चौकार आणि 4 षटकार खेचले. ट्रॅव्हिस हेडने या कसोटी सामन्यात 99.29 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाला 337 धावांपर्यंत मजल मारण्यास मदत केली. ट्रॅव्हिस हेडच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात भारताविरुद्ध 157 धावांची आघाडी घेतली होती. ट्रॅव्हिस हेडने 140 धावा करत भारताच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले.

या पराभवानंतर भारताला WTC Points Table मध्ये मोठा धक्का बसला आहे. कारण या पराभवानंतर भारताच्या विजयाची टक्केवारी कमी झाली आहे. यापूर्वी भारतीय संघ अव्वल स्थानावर विराजमान होता. पण आता भारत या पराभवानंतर तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube