Cricket News : भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वीच ‘हे’ दोन खेळाडू झाले बाहेर
मुंबई : भारताविरुद्धच्या (India) चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला (Australia) मोठा धक्का बसला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (Josh Hazlewood) 9 फेब्रुवारीपासून होणाऱ्या पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो नागपुरात खेळणार नाही. एवढेच नाही तर दिल्लीतील दुसऱ्या कसोटीत हेजलवूडची खेळण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या जागी स्कॉट बोलंडचा प्लेइंग-11 मध्ये समावेश केला जाऊ शकतो. तो प्रथमच ऑस्ट्रेलियाबाहेर कसोटी खेळू शकतो.
मालिकेपूर्वी दुखापत झालेला हेझलवूड हा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू नाही. त्याच्या आधी मिचेल स्टार्क बोटाच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्याचबरोबर कॅमेरून ग्रीनही बोटाच्या दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात गोलंदाजी करणार नाही. त्याला खेळण्याची संधी मिळाली तर तो फक्त फलंदाजी करेल. गेल्या महिन्यात सिडनी कसोटीदरम्यान हेजलवूडला दुखापत झाली होती. हेझलवूडने अलूर येथे ऑस्ट्रेलियाच्या प्री-सीरिज कॅम्पमध्ये पूर्ण सहभाग घेतला नव्हता.
भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), एश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (विकेटकीपर) मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर
कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी – 9 ते 13 फेब्रुवारी, नागपूर
दुसरी कसोटी – 17 ते 21 फेब्रुवारी, दिल्ली
तिसरी कसोटी – 1 ते 5 मार्च, धर्मशाला
चौथी कसोटी – 9 ते 13 मार्च, अहमदाबाद