Vidyanand Bapat’s Shlok Goes Viral : विद्यानंद बापट हे आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. त्यांनी मांडलेला डिजे मुक्त (DJ Ban) गणेशोत्सवाचा (Ganesh Festival) मुद्दा आणि त्यांची उत्कृष्ठ भाषाशैली यांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे. पुण्याच्या नारायण पेठेतील विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) हे गणेशोत्सवात वाजवले जाणारे ढोल-ताशे आणि डीजे यांमुळे ध्वनीप्रदुषण होत आहे, त्यामुळे लोकांना याचा त्रास होतोय, असे त्यांचे मत आहे. त्यांच्या या मताशी अनेकजण सहमत आहेत. याकरिता त्यांना अनेक गणेशभक्तांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. त्यांच्यावर पुण्यातील टिळक चौकात हल्लाही करण्यात आला.
डीजे विरूद्ध आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला; टिव्ही शो दरम्यान घडला प्रकार
ध्वनीप्रदुषणमुक्त गणेशोत्सवाबाबत बोलताना त्यांच्या भाषाशैलीचा प्रत्येकाला अंदाज आला पण या दरम्यान त्यांनी म्हणलेल्या एका संस्कृत श्लोकाची चांगलीच चर्चा होत आहे. “घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्।” हा विद्यानंद बापट यांनी म्हटलेला श्लोक. या श्लोकावर अनेक रिल्सही तयार करण्यात आल्या आहेत.
ज्याची सोशल मीडियावर खुप चर्चा होत आहे. मात्र, या श्लोकाचा नेमका अर्थ काय, असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर विद्यानंद बापट यांनीच या श्लोकाचा अर्थ स्पष्ट केला आहे. “मडके फोडावे, वस्त्र फाडावे आणि गाढवावर बसावे; पण कोणत्याही प्रकारे प्रसिद्ध व्हावे,” असा या श्लोकाचा अर्थ असल्याचे बापटांनी सांगितले आहे.
आठ-दहा दिवस वाट पाहू मग… शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीवर शरद पवार स्पष्टच बोलले
हे एक उपरोधिक सुभाषित असून, एखाद्या व्यक्तीच्या कृतीवर टीका करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. प्रसिद्धी मिळवण्यासाठी माणूस कोणतीही हास्यास्पद, विचित्र किंवा लाजिरवाणी कृती करण्यासही मागेपुढे पाहत नाही, असा या सुभाषिताचा थोडक्यात अर्थ होत आहे.
