डीजे विरूद्ध आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला; टिव्ही शो दरम्यान घडला प्रकार

Attack on Vidyanand Bapat, who raised his voice against DJs in Pune विद्यानंद बापट यांना टिळक रोडवरील कशाळे चौकात बेदम मारहाण करण्यात आली आहे.

Attack On Vidyanand Bapat

Attack on Vidyanand Bapat, who raised his voice against DJs in Pune : गणेश उत्सवात डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या आणि अल्पावधीतच प्रसिद्धीत आलेल्या विद्यानंद बापट यांना टिळक रोडवरील कशाळे चौकात बेदम मारहाण करण्यात आली आहे. टिव्ही 9 मराठीच्या शो दरम्यान काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली आहे.

Maratha Protest : जरांगेंची प्रकृती खालावली, सहा दिवसांपासून काय-काय घडतंय?

पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण

गणेश उत्सवात डीजे वादान विरोधात भूमिका घेणाऱ्या आणि अल्पावधीतच प्रसिद्धीत आलेल्या विद्यानंद बापट यांना टिळक रोडवरील कशाळे चौकात मारहाण करण्यात आली आहे. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली आहे. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत असताना बापट यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. विद्यानंद बापट हे सातत्याने dj विरोधी भूमिका घेत आहेत.गणेश विसर्जन मिरवणुकीत ज्या टिळक रडत्यावर dj चा दणदणाट असतो त्याच टिळक रस्त्यावर त्यांना मारहाण झाली आहे.

तुकाराम मुंढेंची पोस्ट चर्चेत: जेव्हा पाकीटावरचे लेबल खोटे ठरते, तेव्हा त्याची किंमत ग्राहकाला मोजावी लागते…

मी प्रतिक्रिया देत होतो तितक्यात एक वेडा आहे आणि माझ्यावर हल्ला केला कारण मी निशस्र होतो. त्याला फक्त सवंग प्रसिद्धी हवी होती मी जस म्हणतो घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् अगदी तसंच. आता पोलिसांकडे सगळे फुटेज त्यात पाहून पोलिसांनी त्याला ताब्यात घ्यावं आणि तुडवून काढावं म्हणजे त्याला कळेल मुद्द्याचं उत्तर मुद्द्याने द्यायचं असत गुद्याने नाही. अशी प्रतिक्रिया या मारहाणीनंतर बापट यांनी दिली आहे.

follow us