Download App

बॅंक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू, आजच करा अर्ज…

  • Written By: Last Updated:

BOI Recruitment 2024 : तुम्ही देखील बॅंकेतील नोकरीच्या (Job) शोधात असाल तर तुमच्याठी आता एक आनंदाची बातमी आहे. बॅंक ऑफ इंडियाने (Bank of India) नुकतीच एक भरती जाहीर केली आहे. स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिस या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसंदर्भातले नोटिफिकेशन बॅंकेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले.

Loksabha Election: गोविंदाची पुन्हा राजकारणात एन्ट्री! शिवसेनेत पक्षप्रवेश, उत्तर-पश्चिम मुंबईतून रिंगणात उतरणार? 

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार Bankofindia.co.in अधिकृत संकेतस्ळावर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 3 एप्रिल 2024 असेल.

पदांचा तपशील
बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँकेने MMGS-II मध्ये स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली.
SC – 2

ST-1

OBC – 4

EWS – 1

GEN – 7

वयोमर्यादा:
या पदभरतीठी अर्ज करणार्या उमेदवारांचे वय हे २५ ते ३५ वर्षे दरम्यान असावे.

शैक्षणिक पात्रता:
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे आणि तीन महिन्यांच्या संगणक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे.

Letsupp Special शिवतारेंनी स्वतःच आग लावली…. मग ती विझली कशी? जाणून घ्या इनसाईड स्टोरी! 

अनुभव:
संभाव्य अर्जदारांकडे खालीलपैकी एक अनुभव असणे आवश्यक आहे:
1. उमेदवाराकडे आर्मी, नेव्ही किंवा एअर फोर्समध्ये पाच वर्षांपेक्षा जास्त सेवेसह अधिकारी पद असावे.
2. पोलीस अधिकारी उपअधीक्षक किंवा उच्च पदावर किमान पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
3. निमलष्करी दलात असिस्टंट कमांडंटच्या पदासाठी किमान पाच वर्षे काम केलेले असावे.

निवड प्रक्रिया

या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमदेवारांची निवड ही मुलाखतीद्वारे किंवा गट चर्चेद्वारे केली जाईल. (प्राप्त अर्जांच्या संख्येवर आधारित जीडी आयोजित केली जाईल.) उमेदवारांची यादी तयार केली जाईल. संबंधित SC/ST/OBC/EVS/सामान्य श्रेणीनुसार उतरत्या क्रमाने 30 गुणांची वैयक्तिक मुलाखत आणि 70 गुणांची गट चर्चा करून उमेदवारांना मिळालेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.

अर्ज फी –
अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांसाठी अर्जाची फी रु 175 आहे. तर, सर्वसाधारण आणि इतर श्रेणींसाठी अर्ज शुल्क 850 रुपये असेल.

अर्ज कसा करायचा?
प्रथम बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट bankofindia.co.in ला भेट द्या.
यानंतर करिअर किंवा रिक्रूटमेंट विभागात जा.
नवीन नोंदणी लिंकवर क्लिक करा.
तिथं तुमची माहिती सर्व तपशील भरा.
सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
त्यानंतर अर्जाची फी भरून अर्ज सबमिट करा.

अर्ज करण्यासाठी लिंक – https://ibpsonline.ibps.in/boissafeb24/

अधिसुचना –
https://bankofindia.co.in/documents/d/guest/final_notice_security_officers_-project_2023-24-2-

follow us