Critical Illness Insurance Cover : गंभीर आजारांच्या उपचारासाठी रुग्णांना मोठी रक्कम खर्च करावी लागते. जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतला (Health Insurance) असेल तर त्यात साधारण आजारांचे संरक्षण मिळू शकते. पण कॅन्सर, हार्ट अटॅक यांसारख्या गंभीर आजरांच्या वेळी ही पॉलिसी कामी येईलच असे नाही. अशा वेळी तुम्हाला इलनेस कव्हरची गरज भासू शकते.
कॅन्सर किंवा हार्ट अटॅक यांसारख्या गंभीर आजरांच्या उपचारांसाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात. क्रिटिकल इन्शुरन्स (Critical Illness Insurance) या आजारांना कव्हर करतो. यामध्ये हार्ट अटॅक, कॅन्सर, किडनी फेल, पॅरालिसीस, ट्युमर, कोमा आणि अवयव प्रत्यारोपण यांसारख्या गंभीर आजरांचा समावेश असतो. या सर्व आजारांचा उपचार खूप महागडा असतो. तसेच हा उपचार दीर्घ काळ सुरू असतो. अशा परिस्थितीत क्रिटिकल इलनेस इन्शुरन्समुळे मोठा दिलासा मिळू शकतो.
गंभीर आजरांच्या उपचाराच्या खर्चातून मोठा दिलासा मिळतो. यामध्ये वयाच्या 45 वर्षांपर्यंत कोणत्याही मेडिकल चेकअपचीही गरज पडत नाही. गंभीर आजाराच्या वेळी कंपनी विमधारकाला एकावेळी मोठी रक्कमही देऊ शकते. यामध्ये कलम 80 डी नुसार करात सवलत सुद्धा मिळते.
काम की बात! रिटायरमेंटसाठी कशी कराल बचत? कुठे गुंतवाल पैसा? वाचा सविस्तर..
क्रिटिकल इलनेस इन्शुरन्समध्ये हार्ट अटॅक, स्ट्रोक, कॅन्सर, पक्षाघात, अवयव प्रत्यारोपण, ब्रेन ट्यूमर यांसारखे गंभीर आजार कव्हर केले जातात. क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याआधी परिवाराची मेडिकल हिस्ट्री तपासणी केली पाहिजे. यामुळे पॉलिसी घेताना कोणत्या आजारांना प्राधान्य दिले पाहिजे हे ठरवता येते.
क्रिटिकल इन्शुरन्स कव्हरेजचे प्रीमियम खूप जास्त असतात. जर एखादा रुग्ण आधीपासूनच एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त असेल तर अशा परिस्थितीत विमा प्रीमियम खूप जास्त असू शकतो.
क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स मध्ये फक्त गंभीर आजारांना संरक्षण मिळू शकते.
क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स कव्हरसाठी वेटींग कालावधी सुद्धा खूप जास्त असतो. यामुळे उपचारासाठी क्लेम करताना अनेक अडचणी येतात.
या इन्शुरन्सचे नियम आणि अटी जटील असू शकतात. यामुळे विमाधारक गोंधळात पडू शकतात. कोणत्या आजारांना यामध्ये कव्हर केले आहे याची माहिती घेतानाही अडचणी निर्माण होऊ शकतात.
क्रिटिकल इलनेस इन्शुरन्समध्ये वेळोवेळी प्रीमियममध्ये वाढ होऊ शकते. यांमुळे संबंधित विमाधारकाला आणखी जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात.
तुमच्या खास दिवसाला बनवा सुरक्षित; जाणून घ्या Wedding Insurance चं महत्व