Download App

काम की बात! क्रेडिट कार्ड बंद करताय मग, CIBIL स्कोअरही कमी होणार?, जाणून घ्या गणित…

जुने क्रेडिट कार्ड (Credit Card) किंवा लोन खाते बंद करणे याचा यामध्ये समावेश करता येईल. हा निर्णय अनेकदा नुकसानकारक ठरू शकतो.

Credit Card News : आजच्या काळात सिबील स्कोअरकडे (CIBIL Score) आर्थिक स्थैर्याचे निदर्शक म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे क्रेडिट स्कोअर खराब (Credit Score) होऊ नये याची काळजी अनेकांकडून घेतली जाते. परंतू न कळत असे काही निर्णय घेतात ज्यामुळे त्यांच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. जुने क्रेडिट कार्ड (Credit Card) किंवा लोन खाते बंद करणे याचा यामध्ये समावेश करता येईल. हा निर्णय अनेकदा नुकसानकारक ठरू शकतो. कारण यामुळे तुमची क्रेडिट हिस्ट्री (Credit History) आणि क्रेडिट स्कोअर यांवर परिणाम होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊ की जुने क्रेडिट खाते बंद केल्यावर काय परिणाम होऊ शकतात?

क्रेडिट हिस्ट्रीवर परिणाम

क्रेडिट स्कोअरच्या कॅल्क्युलेशनमध्ये क्रेडिट हिस्ट्रीची मोठी यादी महत्त्वाची भूमिका बजावते. जर तुम्ही एखादे जुने क्रेडिट कार्ड किंवा कर्ज खाते बंद करता त्यानंतर या व्यवहाराची नोंद कालांतराने क्रेडिट रिपोर्टमधून नाहीशी होते. यामुळे तुमच्या एकूण क्रेडिट हिस्ट्रीचा कालावधी कमी होऊ शकतो. परिणामी क्रेडिट स्कोअरमध्ये घसरण होऊ शकते. मोठी आणि चांगली क्रेडिट हिस्ट्री टिकवून ठेवणे भविष्यात कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेण्यात मदतकारक ठरू शकतात.

एक एप्रिलपासून कार कंपन्यांनी वाढवल्या किंमती; कोणत्या कारसाठी किती लागणार जास्तीचे पैसे?

क्रेडिट कार्डच्या वापरावर परिणाम

क्रेडिट कार्ड वापराचा रेशो तुमच्या एकूण क्रेडिट कार्ड मर्यादेच्या तुलनेत तुम्ही किती पैसे वापरले याचे प्रमाण दर्शवतो. तज्ञांच्या म्हणण्यानुसार हे प्रमाण 30 टक्क्यांपेक्षा कमी ठेवले पाहिजे. उदा. जर तुमची क्रेडिट मर्यादा 1 लाख रुपये आहे आणि जर तुम्ही यातील 30 हजार रुपये खर्च केले तर तुमचे खर्चाचे प्रमाण संतुलित राहील. पण जर तुम्ही एखादे जुने क्रेडिट कार्ड बंद केले तसेच तुमची क्रेडिट मर्यादा 50 हजार रुपये राहिली तर तुमचे खर्चाचे प्रमाण 60 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. यामुळे सुद्धा क्रेडिट स्कोअर वर विपरीत परिणाम होऊ शकतो.

जुने क्रेडिट खाते बंद केल्याने अनेकदा क्रेडिट स्कोअरमध्ये तात्पुरती घसरण झालेली दिसते. जर नवीन खाते उघडले असतील तर यातून संबंधित व्यक्ती आर्थिक दृष्ट्या अस्थिर आहे असा संदेश जाऊ शकतो. यामुळे कर्ज देणाऱ्या बँका आणि वित्तीय संस्था यांचा विश्वास कमी होऊ शकतो.

चांगल्या क्रेडिट स्कोअर साठी काय करावे

जर क्रेडिट कार्ड बंद करणे गरजेचे असेल तर आधी कार्डची उपयुक्तता आणि शुल्क यांचा आढावा घ्या. कोणतेही नवीन कार्ड घेतल्यानंतरच जुने कार्ड बंद करा. जेणेकरून तुमच्या क्रेडिट स्कोअर वर याचा कमीत कमी परिणाम होईल. कमी वापर होणाऱ्या कार्डलाही वेळोवेळी वापरात आणत राहा. यामुळे कार्ड पूर्ण निष्क्रिय होणार नाही. जुने खाते बंद करण्याआधी याचे परिणाम काय होतील हे समजून घेणे गरजेचे आहे.

Video : सायबर चोरट्यांनी 10 महिन्यांत लुटले 4,245 कोटी; राज्यसभेत सरकारची माहिती

follow us