एक एप्रिलपासून कार कंपन्यांनी वाढवल्या किंमती; कोणत्या कारसाठी किती लागणार जास्तीचे पैसे?

एक एप्रिलपासून कार कंपन्यांनी वाढवल्या किंमती; कोणत्या कारसाठी किती लागणार जास्तीचे पैसे?

Car Price Hike :  नवीन आर्थिक वर्ष 2025-26 पासून ग्राहकांना मोठा धक्का बसणार आहे. (Car Price) नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 एप्रिलपासून 8 कार कंपन्यांच्या किमती वाढणार आहेत. मारुती, ह्युंदाई आणि टाटा मोटर्स, कियासह 8 ऑटो कंपन्यांनी किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

मारुती सुझुकी

1 एप्रिल 2025 पासून मारुती सुझुकीची वाहने 4 टक्क्यांनी महागणार आहेत. कच्च्या मालाची वाढती किंमत आणि ऑपरेटिंग खर्च पाहता कंपनी एप्रिलपासून आपल्या कारच्या किमती वाढवणार आहे.

टाटा मोटर्स

1 एप्रिलपासून टाटा मोटर्सची सर्व प्रवासी आणि व्यावसायिक वाहने 2 टक्क्यांनी महागणार आहेत. कंपनीने सांगितले की, कच्च्या मालाच्या किमतीत झालेल्या वाढीची भरपाई करण्यासाठी किमतीत वाढ करण्यात आली आहे आणि किंमती वेगवेगळ्या मॉडेल्स आणि व्हेरियंटनुसार बदलणार आहेत.

सणासुदीत नवीन कार खरेदीचा विचार? 5 लाखांपेक्षा स्वस्तात खरेदी करा ह्या जबरदस्त कार्स

महिंद्रा अँड महिंद्रा

भारतातील आघाडीची SUV उत्पादक कंपनी Mahindra & Mahindra (M&M) 1 एप्रिल 2025 पासून त्यांच्या SUV आणि CVच्या किमती वाढवणार आहे. कंपनीने शुक्रवारी (21 मार्च) किमतीत 3% पर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे.

रेनॉल्ट इंडिया

रेनॉल्ट इंडियाने देखील जाहीर केले आहे की ते त्यांच्या सर्व कार मॉडेल्सच्या किमती एप्रिलपासून 2 टक्क्यांनी वाढवतील. किंमतीतील वाढ मॉडेल आणि प्रकारावर अवलंबून असेल. कंपनीने सांगितले की, वाढत्या उत्पादन खर्चामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

किआ

किआ इंडियाने देखील आपल्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनी सर्व गाड्यांच्या किमती 3 टक्क्यांनी वाढवणार आहे. वस्तूंच्या किमतीत वाढ आणि पुरवठा साखळीशी संबंधित खर्चात वाढ झाल्यामुळे Kia इंडियाने आपल्या सर्व कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

होंडा

होंडाने कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली असली तरी कारची किंमत किती वाढणार हे सांगितले नाही. या नवीन किमती 1 एप्रिल 2025 पासून लागू होतील.

ह्युंदाई

1 एप्रिल 2025 पासून Hyundai कंपनीची वाहने 3 टक्क्यांनी महाग होणार आहेत. वाढता इनपुट खर्च, वाढलेल्या वस्तूंच्या किमती आणि इतर कारणांसह वाढत्या खर्चामुळे वाहनांच्या किमतीत वाढ जाहीर करण्यात आली आहे.

बीएमडब्लु

बीएमडब्यलु इंडियाने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमतीत 3 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. नवीन किमती 1 एप्रिल 2025 पासून लागू होतील. वाढत्या इनपुट खर्चामुळे किंमतीत वाढ केली जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या