Download App

वयाच्या तिशीनंतर आहारात करा ‘हे’ बदल, दिसाल यंग अन् हँडसम

Lifestyle News : वाढत्या वयात शरीराची शक्ती कमी होत जाते हे अगदी खरं आहे. वाढत जाणार वय कुणीही थांबवू शकत नाही. एकवेळ तुम्ही ही प्रोसेस मंद करू शकता पण वाढत जाणारं वय थांबवू शकत नाही. अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही वयाची तिशीपासूनच सुरू केल्या तर बरेच काही सोपे होऊ शकते. वयाच्या तीस वर्षांनंतर जर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष दिले, नियमित व्यायाम केला तर तुम्ही तुमच्या वयापेक्षा दहा वर्षे कमी वय असल्याचे अनुभवू शकता. चला तर मग आज या निमित्ताने जाणून घेऊ की वयाच्या तिशीनंतर खाण्यापिण्याच्या सवयीत काय बदल केले पाहिजेत.

फायबर युक्त आहार घ्या

फायबर अन्न व्यवस्थित पचण्यास मदत करते. जेव्हा वयाच्या तिशीनंतर शरीरातील मेटाबोलिजम मंद होतो त्यावेळी तुम्हाला फायबरपासून अधिक पोषक घटक मिळू शकतात. हिरव्या पालेभाज्या, पेरू, डाळ यांसारख्या घटकात फायबर भरपूर असते. हृदयविकार, टाईप 2 डायबिटीस, स्ट्रोक, कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी फायबर आवश्यक मानले जाते. कठोर डाएट आकर्षक वाटते पण याचे काही साईड इफेक्ट आहेत. वयाच्या तिशीनंतर तुम्हाला कठोर डाएट ऐवजी हेल्दी डाएट सुरू करण्याची जास्त गरज आहे.

मेंदूचा ‘हा’ आजार ओळखणं आता आणखी सोपं; नव्या अभ्यासातून मोठा खुलासा..

कॅल्शियम आणि ओमेगा

वयाच्या पस्तीशीनंतर हाडे ठिसूळ होऊ लागतात. म्हणून रोजच्या आहारात कॅल्शियम युक्त खाद्यपदार्थ असणे जास्त गरजेचे आहे. 30 वर्षानंतर महिलाना हाडांची काळजी घेणे आव्हानात्मक असते. कारण 30 वर्षानंतर महिलाना हाडांच्या समस्या अधिक जाणवू लागतात. हाडांच्या आरोग्यासाठी आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त खाद्यपदार्थ असणे गरजेचे आहे. डेअरी प्रोडक्टमध्ये या दोन्ही गोष्टी असतात. या व्यतिरिक्त ओमेगा 3 चाही आहारात समावेश करा. ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन बी 6 ने भरपूर पोषक तत्वांनी भरपूर खाद्यपदार्थांचे सेवन करा.

स्वच्छ अन् हेल्दी खाद्यपदार्थ खा

हार्मोन्सच्या पातळीचे संतुलन राखण्यासाठी हेल्दी खाद्यपदार्थ आहारात समाविष्ट करा. वाढत्या वयाबरोबरच शरीरात हार्मोनल असंतुलन जाणवू लागते. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ही समस्या जास्त दिसून येते. यासाठी प्रोसेस केलेले खाद्यपदार्थ खाणे कमी करा. तसेच जास्त मीठ असलेले पदार्थही वर्ज्य करा.

कोलेजनवर भर द्या

कॉलेजन एक अत्यंत आवश्यक प्रोटीन आहे. त्वचा आणि सांध्यांसाठी हे प्रोटीन गरजेचे आहे. जसजसे वय वाढत जाते तसतसे शरीरात कॉलेजनचे उत्पादन कमी होत जाते. त्वचेला तरुण राखण्यासाठी कॉलेजन अत्यंत आवश्यक मानले जाते.

अतिविचार करणं त्रासदायकच, तुम्हालाही जडलीय का ही सवय? मग, ‘या’ जापानी टेक्निक वापरा अन् राहा हॅपी..

जास्त पाणी प्या पण..

वयाच्या तिशीनंतर दररोज दहा ते बारा ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. याबरोबरच तुम्ही ग्रीन टी आणि नारळ पाणी देखील पिऊ शकता. पण दररोज किती पाणी पिले पाहिजे याचा सल्ला तुम्ही आधी आरोग्य तज्ञाकडून घ्या.

follow us