अतिविचार करणं त्रासदायकच, तुम्हालाही जडलीय का ही सवय? मग, ‘या’ जापानी टेक्निक वापरा अन् राहा हॅपी..

अतिविचार करणं त्रासदायकच, तुम्हालाही जडलीय का ही सवय? मग, ‘या’ जापानी टेक्निक वापरा अन् राहा हॅपी..

Overthinking Habit : आजकाल लोक त्यांच्या बिझी लाइफमध्ये अगदी गुरफटून गेले आहेत. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे (Mental Health) दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे मेंटल प्रॉब्लेम्स निर्माण होत आहेत. यामध्ये ओव्हरथिंकिंग समस्या (Overthinking Habit) कॉमन झाली आहे. ही एक अशी स्थिती असते ज्यामध्ये व्यक्ती स्वतःला सर्वांपेक्षा अगदी वेगळा आणि सर्वात कमकुवत समजू लागतो. असा विचार फक्त त्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावरच नाही तर शारीरिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम करतो.

जर तुम्ही सुद्धा या परिस्थितीत असाल आणि मनाला शांत करण्याचा प्रयत्न करत असाल तर काही जपानी टेक्निक्सचा वापर करू शकता. या अशा काही टेक्निक्स आहेत ज्यांच्या मदतीने अतिविचार करण्याची सवय कमी होते. या टेक्निक्स काय आहेत हे माहिती करून घेण्याच्या आधी ओव्हरथिंकिंग म्हणजे नेमकं काय हे आधी समजून घेऊ या..

ओवरथिंकिंग म्हणजे काय

ओवरथिंकिंग म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल वारंवार विचार करत राहणे. ही सवय मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करते. ज्यावेळी तुम्हाला एखादी गोष्ट त्रासदायक वाटत असेल त्यावेळी त्याच गोष्टीबद्दल तुम्ही वारंवार विचार करता. म्हणजेच तुम्ही ओवरथिंकिंग समस्येने ग्रस्त आहात असा त्याचा अर्थ होतो. या सवयीला कमी करण्यासाठी तुम्ही काही जपानी टेक्निक्सचा वापर करू शकता.

‘टीबी’चा विळखा करा सैल! आरोग्य मंत्रालयाने सांगितली 10 लक्षणे; वाचा अन् उपाय अमलात आणाच..

इकीगाई (जीवनाचे उद्दिष्ट ओळखणे)

इकीगाई शब्दाचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करू इच्छिता आणि याला चांगले करण्यासाठी काय करू शकता. तुम्ही जर या गोष्टीवर पूर्ण फोकस केला तर याद्वारे तुमचा लाइफबद्दलचा उद्देश क्लिअर राहतो. तसेच तुम्ही जीवनात पुढे वाटचाल करत राहता. तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्या गोष्टीबद्दल सारखा सारखा विचार करून वेळ वाया घालवणार नाहीत.

शिनरिन योकू (फॉरेस्ट बाथ)

शिनरीन योकू एक खास जपानी टेक्निक आहे. या माध्यमातून तुम्ही तुमचे मानसिक आरोग्य चांगले राखू शकता. या शब्दाचा अर्थ होतो फॉरेस्ट बाथ. म्हणजेच अशी एखादी शांत जागा जी निसर्गाच्या सानिध्यात असेल त्या जागेवर जाऊन बसले जाते. नंतर येथे ध्यान लावण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रोसेसमध्ये मनातून नकारात्मक विचारांना काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो.

काइजेन (सेल्फ इम्प्रूवमेंटकडे एक पाऊल)

या टेक्निकमध्ये तुम्ही तुमच्यासाठी काही उद्दिष्ट निश्चित करता. नंतर त्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करता. या जपानी टेक्निकने कोणतेही कठीण काम हळूहळू सुरू करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे अतिविचार करण्याची समस्या कमी होऊ शकते.

सर्वात धोकादायक त्वचारोग कोणता? त्याची लक्षणे काय…जाणून घ्या एका क्लिकवर

वाबी साबी (अपूर्णता वाईट नाही)

वाबी साबी एक जपानी टेक्निक आहे ज्यामध्ये प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याऐवजी इम्परफेक्ट गोष्टीत परफेक्शन शोधण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या गोष्टी जशा घडत आहेत त्या बरोबर आहेत असे तुम्ही गृहित धरता.

जांशिन (फोकस्ड अवेअरनेस)

जांशिन अशी एक जापानी टेक्निक आहे जिच्या मदतीने तुम्ही अलर्ट आणि अवेयर राहता. जीवनात नेमकं काय करायचं आहे कशा पद्धतीने जीवन जगायचं आहे याचा मार्ग सापडतो. ही टेक्निक तुम्हाला माइंडफुल बनण्यात मदत करते. वर्तमानकाळात आनंदाने जगण्यासही मदत करते. त्यामुळे या काही खास टेक्निक्सच्या मदतीने तुम्ही अतिविचार करण्याच्या वाईट सवयीतून बाहेर पडू शकता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube