Download App

Government Schemes : एक शेतकरी एक डीपी योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

Government Schemes : एक शेतकरी एक डीपी योजना ही नवीन योजना (one farmer one DP scheme)14 ऑक्टोबर 2020 या दिवशी मंजूर करण्यात आली आहे. मार्च 2014 पर्यंत या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी (Farmer)योजनेसाठी शुल्क भरलं होतं. त्यामध्ये दोन लाख 24 हजार 785 शेतकर्‍यांना ट्रान्सफॉर्मर(Transformer) बसवणं गरजेचं होतं. राज्यातील शेतकऱ्यांना अनियमित वीज, लाईट जाणे, तारांवर प्रकाश टाकणे, लाईट, वीज कट, जीवघेणा धोक्यात येऊ नये उभा सर्व गोष्टींचा विचार करुन एचव्हीडीएसला (HVDS)उच्च दाबाची वीज (Electricity)देण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेचा आतापर्यंत हजारो शेतकर्‍यांनी फायदा घेतला आहे.

‘सालार’ची परदेशातही क्रेझ, चित्रपट पाहण्यासाठी थेट जपान ते हैदराबाद केला प्रवास

योजनेचे उद्दिष्ट :
– लघुदाब वाहिनीची लांबी वाढल्याने शेतकऱ्यांना कमी दाबाने वीज पुरवठा होणे
– विद्युत पुरवठा मध्ये वारंवार बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होणे
– तांत्रिक वीज हानी वाढणे
– रोहित्र बिघाड होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ
– विद्युत अपघात
– लघुदाब वाहिनीवर आकडा टाकून विद्युत चोरी करणे.

यासह विविध गोष्टींवर उपाय म्हणून ही योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील कृषीपंपांना यापुढे उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Letsupp Special : भाजपचा ‘अशोक चव्हाणांवर’ डोळा; पण कट्टर काँग्रेसी गळाला लागणार का?

योजनेचे फायदे काय?
– ज्या शेतकऱ्यांच्या दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे, त्यांना प्रति HP 7 हजार रुपये द्यावे लागतील.
– अनुसूचित जाती जमाती (एससी / एसटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांना व 5 हजार रुपये द्यावे लागतील.

आवश्यक कागदपत्रे :
– आधार कार्ड
– मोबाइल नंबर
– शेतीचा 7/12 उतारा
– जातीचे प्रमाणपत्र
– बँक खाते क्रमांक

अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा : wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getNewConnectionRequest&Lang=English

ऑफिसिअल वेबसाइट : mahadiscom.in

हेल्पलाईन नंबर :
राष्ट्रीय टोल-फ्री – 1992 / 19120
महावितरण टोल-फ्री : 1800-102-3435
1800-233-3435

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.

follow us