‘सालार’ची परदेशातही क्रेझ, चित्रपट पाहण्यासाठी थेट जपान ते हैदराबाद केला प्रवास

‘सालार’ची परदेशातही क्रेझ, चित्रपट पाहण्यासाठी थेट जपान ते हैदराबाद केला प्रवास

Salar: Part 1-Ceasefire : प्रभासचा (Prabhas) ‘सालार: भाग 1-युद्धविराम'(Salar: Part 1-Ceasefire) अखेर रिलीज झाला आहे. कमाईचे तो रेकॉर्डही मोडत आहे. प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन (Shruti Haasan) आणि जगपती बाबू यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या पहिल्या सीन्सपासून संपूर्ण चित्रपटाचे सादरीकरण आणि दिग्दर्शनाची उत्कृष्ट झलक पाहायला मिळते. चित्रपटातील काली माँच्या सीन्सवर नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

भारतीय चाहत्यांनी या चित्रपटाबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. अशात परदेशातील प्रभासच्या चाहत्यांमध्येही पुन्हा एकदा प्रचंड क्रेझ दिसून आली. त्याच्या चाहत्यांनी भारतात येऊन चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला आहे.

Sridevi Prasanna: ‘चहा घेणार की कॉफी?’; सई ताम्हणकरच्या ‘श्रीदेवी प्रसन्न”चं मोशन पोस्टर रिलीज

प्रभासची क्रेझ त्याच्या चाहत्यांना वेड लावत आहे. अलीकडेच, काही चाहत्यांनी त्याच्या घरासमोर सालारचे टी-शर्ट घालून गर्दी केल्याचे दिसून आले होते. त्यानंतर हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये प्रभासच्या कटआउटसह चित्रपट पाहण्यास आले होते.

‘धक धक गर्ल’ राजकारणात? खुद्द माधुरीचाच चर्चेला फुलस्टॉप; म्हणाली, ‘माझी आवड राजकारण..,’

प्रभासचा ‘सालार: भाग 1-युद्धविराम’ हा चित्रपट कमाईचे विक्रम प्रस्थापित करत आहे. प्रोजेक्ट K आणि कल्कि 2898 AD या चित्रपटांसह त्याचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube