Sridevi Prasanna: ‘चहा घेणार की कॉफी?’; सई ताम्हणकरच्या ‘श्रीदेवी प्रसन्न”चं मोशन पोस्टर रिलीज

Sridevi Prasanna: ‘चहा घेणार की कॉफी?’; सई ताम्हणकरच्या ‘श्रीदेवी प्रसन्न”चं मोशन पोस्टर रिलीज

Sridevi Prasanna Motion Poster Release Out: टिप्स फिल्म्स प्रस्तुत आणि कुमार तौरानी (Kumar Taurani) यांची निर्मिती नव्या वर्षात, एक नवी लव्ह स्टोरी आणि आपल्या लाडक्या जोडीसह टिप्स फिल्म्स प्रस्तुत करत आहे पहिला मराठी चित्रपट ‘श्रीदेवी प्रसन्न’. (Sridevi Prasanna) हा येत्या 2 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tips Films (@tipsfilmsofficial)


“श्रीदेवी प्रसन्न” या चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वासह बॉलीवूडलाही (Bollywood) भुरळ घालणारी मोस्ट ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि स्मार्ट अँड डॅशिंग म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) अशी भन्नाट आणि बेमिसाल जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र आहे. आजवर अनेक हीट चित्रपट देणारे हे दोन्ही दमदार कलाकार एकत्र येऊन एक वेगळीच प्रेमकहाणी फुलवणार आहे. या निमित्ताने नव्या वर्षात, एक नवी आणि आगळीवेगळी लव्ह स्टोरी आपल्या लाडक्या जोडीसह चाहत्यांना अनुभवता येणार आहे.

सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिकेसह सुलभा आर्या, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वांखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे अशी दमदार कास्ट या चित्रपटात आहे. त्यामुळे श्रीदेवी आणि प्रसन्न यांच्या लव्हस्टोरी सोबत हा एक कंप्लीट फॅमिली सिनेमा आहे.

Panchak: ‘चमत्कार’ सांगणार आयुष्याचा भावार्थ ‘पंचक’मधील हृदयस्पर्शी गाणं संगीतप्रेमींच्या भेटीला

या मराठी सिनेमाचे लेखन अदिती मोघे यांनी केले असून विशाल विमल मोढवे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर अमित राज यांनी संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. लवकरच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला येणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज